Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. कांहीं कारणामुळे शेटजींच्या बरोबर त्याचें सात आठ दिवस बाहेर गांवी जाणे झाल्याने हा त्याचा उद्योग बराच फलद्रुप झाला. हळू हळू मालतीला तो विसरूं लागला. आपल्या अंतःकरणांत मालतीला आश्रय देण्याचा न्यायतः आपणास कांहीं अधिकार नाहीं, असे त्याला वाटले, ज्याच्यावर सर्वस्वी त्या गृहदेवतेची-त्या लक्ष्मीची मालकी आहे आणि जी केवळ विश्वासु रक्षक ह्मणून स्वतःच्या स्वाधीन जिने केली आहे, ती हृदयां- तील प्रेमज्योति मी मालतीला मालवूं देणार नाही, अशी त्यानें प्रतिज्ञा केली. मुंबईस परत आल्यावर आणखी आठ दहा दिवस त्याचे मालतीच्या भेटीवांचूनच गेले. असेच कांहीं दिवस दिनकरनें घालविले असते तर- पण तेवढा मनोनिग्रह पाहिजे ना ? मनावर सत्ता चालवावयाची वाटतें सोपें; पण तें तितकें सोपें नाहीं. अगदीं क्षुल्लक कारणामुळे देखील हा मनाचा निग्रह ढांसळतो, आणि दिनकरचेंहि तसेच झाले. शेटजींनी त्याला जी एक स्वतंत्र खोली दिली होती, त्या खोलीत तो स्वस्थ बसलेला असतां शेटजींच्या मनुष्याने एक पत्र त्याच्या हाती आणून दिले. पत्रा- वरील आवरण पाहतांच तें मालतीचें पत्र आहे, हे त्यानें हस्ताक्षरावरून तेव्हांच ओळखलें. तें पत्र पाहतांच मोठ्या कष्टानें जे विचार दिनकरनें इतक्या दिवसाच्या प्रयत्नाने थोपटून निजविले होते, ते पुन्हां जागृत होऊं लागले. जे आशेचे तंतु तुटले होते, ते ते पत्र वाचून पाहण्याच्या आधीच पुन्हां गांठणीने सांधू लागले. यावेळी मनोनिग्रहाची दिनकरला फार आवश्यकता होती; परंतु काव्यमय प्रेमाच्या कल्पना इतक्या वाढल्या की, त्याला त्या कल्पनांचे दास व्हावे लागले. कदाचित् त्या पत्रांत निराशेचा तडाखाहि असेल, अशी दिनकरला शंका आली; पण एकंदरीत त्याने ते पत्र मोठ्या उत्सुकतेनेच फोडलें, मुंबई, शांतीसदन तारीख- श्रीयुत दिनकरराव यांस. प्रेमपूर्वक सविनय सा. नमस्कार, आपली भेट नाहीं व निरोप वगैरेहि नाहीं यामुळे मोठी हुरहुर वाटते. आज जवळ जवळ वीस