पान:सुखाचा शोध.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावें. चेतलें होतें. दिनकरसारख्या तेजस्वी तरुणाने केवळ काव्यमय ऐहिक सौख्याच्या कल्पनेला बळी पडून इतकें दुर्बळ बनावें, याबद्दल कोणालाहि आश्चर्य वाटेल. स्त्री असावी, तर अशी अशी असावी वगैरे त्याचे विचार वाचकांना पूर्वीच माहीत झालेले आहेत. मालतीच्या स्वभावाचें निरीक्षण दिनकरनें जर चांगल्या रीतीने केले असते, तर स्वतः दिनकरला हि आपल्या अंगी अनेक दोष आहेत असे दिसून आले असतें. त्याला पियानो विकत घेण्याची शक्ति नव्हती, वाजवितांहि येत नव्हता आणि पियानोचा व ऐहिक सौख्याचा काय संबंध असतो, असे जर कोणी विचारलें असतें, तर त्याचें त्याला उत्तर देतां आले नसतें. बाजाच्या पेटीचेंहि तसेच, गाण्याची गोष्टहि तशीच. स्त्रीला बरोबर घेऊन हातांत हात घालून फिरण्यानें ऐहिक सौख्यांत कशी भर पडते किंवा संसारांतल्या कोणत्या आपत्ति टळतात ? असे जर त्याला विचारले असते, तर तो खचित निरु- त्तर झाला असता. आपले मन भलत्याच मार्गाने-अन्यायाच्या मार्गानें- बहावत आहे, हे त्याच्या लक्षांत येत नसे असें नाहीं; पण स्वतःच्या प्रकृतीचा तो आतां जेता नसून जित होता. त्याचें मन कृत्रिम प्रेमाच्या देखाव्याने दिपून गेले होते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या गृहलक्ष्मीचा आपण अपराध करीत आहों, हेंहि त्याच्या लक्षांत येईनासे झाले होतें. मालतीकडे एकटा मुकुंदच काय पण आणखी दहा तरुण तिच्या बरोबर हंसण्याबोलण्यास आले, तरी त्याबद्दल दिनकरला विपाद बाळगण्याचें कारण नव्हते; परंतु त्याचें मन मत्सरग्रस्त झाल्यामुळे मुकुंदने मालतीशीं हंसणे बोलणें ह्मणजे आपला अपमान करणें होय असें त्याला वाटू लागले. प्रकरण बारावें. -स्वाभाविक सद्गुणाकडे ओढा असलेल्या दिनकरला देखील ते दोनचार दिवस थोडे कठिणच गेले. आतां पुन्हां मालतीच्या घरी जावयाचें नाहीं, असा निश्रय करून तो प्रकृतीवर विजय मिळविण्याच्या उद्योगाला लागला.