१५४ सुखाचा शोध. वामनराव ह्मणाले, " मास्तर, तुझालाच कदाचित् विस्मरण झालें असावें. मिस्तर मुकुंद यांनी हॅम्लेट वाचलें आहे, असें नाहीं; तर हॅम्लेटची त्यांनी भूमिकाहि केली आहे. " मिस्तर मुकुंदहि फुगून जाऊन ह्मणाले, " हॅम्लेट अथपासून इतीपर्यंत मीं मुखोद्गत केलें आहे. हॅम्लेटची पारायणे केल्यावांचून कांहीं मला ती भूमिका करता आली नाहीं, मिस्तर दिनकरराव, ह्मणूनच मी म्हणतों कीं, कोणतेंहि शास्त्र तिकडे सजीव आहे आणि इकडे आम्ही निर्जीव विद्येचें पूजन करीत आहों. तिकडचा ज्ञानरवी कसा प्रखर आहे, याची कल्पना सांगून यावयाची नाहीं. प्रत्यक्ष तेथंच कांहीं दिवस घालविले पाहिजेत. तिकडच्या ज्ञानाची आपण इकडे नुसती छाया पाहतों. प्रतिध्वनि ऐकून खऱ्या शब्दांचें स्वारस्य कसे कळणार ? आतां तिकडे पैसे थोडे आधिक लाग- तात हे खरें; पण मिस्तर दिनकरराव, तुझी पैशाची कांहीं काळजी करूं नका. तुझी विलायतेस जाण्याच्या उद्योगाला लागा, ह्मणजे पैशाच्या बाब तींत काय करावयाचें, हें तुमचें तुझांलाच ठरवितां येईल. खरोखर आपल्या सारख्या विद्वान् गृहस्थानें इंग्लंडांत अवश्य जावयास पाहिजे. त्यामुळे तुमचा तर फायदा होईलच; पण आमच्या देशाचेंहि पुष्कळ कल्याण होईल. " दिनकर ह्मणाला, “ मी मोठा विद्वान् आहे, असे आपणास वाटत असेल; पण तसे समजूं नका. कशी तरी एम्. ए. ची परीक्षा पास झालों आहे, एवढेच आतां कोठें तरी पाचपन्नास रुपयांची नौकरी मिळाली, म्हणजे आमच्या शिक्षणाचें सार्थक झालें ! ” वामनराव म्हणाले, “ दिनकरराव, तुमच्यासारख्या आशावादी गृह- स्थानें असें निरुत्साह होता कामा नये. विलायतेस जावयाचेंन्च असा .ह्मी निश्चय करा म्हणजे पैशाची कांहीं तरी व्यवस्था झाल्यावांचून राह- णार नाहीं, " हंसत हंसत मुकुंद ह्मणाला, " महत्त्वाकांक्षा हा गुण देखील आम्हीं पाश्चात्यांपासूनच शिकावयाला पाहिजे. मनुष्यानें समाधानवृत्तीनें रहावें हें खरें; पण योग्य कारणासाठी त्यानें आपली महत्त्वाकांक्षाहि जागृत
पान:सुखाचा शोध.pdf/१५४
Appearance