Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. ८८ हंसल्यासारखे करून डोके खाजवीत खाजवीत तो म्हणाला, हो, हो ! तसे म्हणावयाला कांहीं हरकत नाहीं; पण सर हेनरी आरव्हिंग – " दिनकरला पुढे बोलूं न देतां मुकुंद मध्येच म्हणाला, त्यांच्या वाग- णुकीसंबंधानें म्हणतां होय ? वाः ! ते फार सुशील आणि सज्जन गृहस्थ आहेत, त्यांना अभिमान असा मुळींच नाहीं. तसेच हिंदी गृहस्थांसंबंधानें त्यांच्या ठिकाणी पूर्ण सहानुभूति आहे. त्यांची गुणग्राहकता, तर अपूर्व आहे. " वामनराव म्हणाले, " तसें असल्यावांचून ते जगांत इतक्या पुढे आले नाहींत, हें स्पष्टच दिसतें. " मालती म्हणाली, " ते नाटकी म्हणून सभ्य समाजांत त्यांचा व्हावा तसा आदरसत्कार होत नसेल ? " मुकुंद म्हणाला, “छेः, छे:! तें कांहीं हिंदुस्थान नाहीं आणि तिकडील नटहि पण इकडील नटाप्रमाणे व्यसनी, शीलहीन व गचाळ नाहींत. त्यांतून सर हेनरी आरव्हिंग यांच्या चरित्रावर तर नजर टाकण्यास मला चांगलीच संधि मिळाली. त्यांचा आणि माझा परिचय जसजसा दाट होत गेला, तसतशी त्यांची निर्दोष वागणूक माझ्या दृष्टोत्पत्तीस येऊ लागली. एकदा त्यांच्या आग्रहावरून हॅम्लेट नाटक पहावयाला गेलो होतो. हॅम्लेटची भूमिका स्वतः त्यांनीच केली होती. त्या वेळी त्यांची ती अभिनय कुशलता पाहून जणूं त्यांच्या हृदयांतील उदात्तताच पहात आहे, असे मला वाटलें. There is a soul of goodness in things evil Could we but opservingly distil it out. हे शब्द त्यांच्या तोंडांतून इतक्या बहारीने निघाले आणि त्यांतहि त्यांनीं Soul शब्दावर जो जोर दिला, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच आत्म्याची ओळख जणूं ते प्रेक्षकांना करून देत आहेत असे वाटलें, आतां या बाबतीत कांहीं बोलावयाचें नाहीं, असा दिनकरने निश्चय केला होता; पण आतां मात्र त्याला बोलल्यावांचून राहवेना. तो म्हणाला, C तुमची चूक तर होत नाहीं ना ? वरील शब्द शेक्स्पीयरच्याच हॅम्लेटचे आहेत ना ? " मुकुंद किंचित् ठांसून ह्मणाला, " होय. हॅम्लेटचेच आहेत. सु० शो०... १०