प्रकरण अकरावें. १५५ ठेवली पाहिजे. दोष दिनकररावांचा नाहीं, तर इकडच्या शिक्षणाचाच आहे. मनुष्याची जिज्ञासा वाढत न जातां ती कमी व्हावी, असा इकडच्या शिक्षणांतच दोप आहे. अहो, म्युझियम आणि राणीचा बाग हीं तर या शहरांत आहेत ना; पण तीं तरी काळजीपूर्वक किती पाहतात ? " यावर दिनकर कांहीं सांगणार तोच मालती आपल्या बापाला ह्मणाली, बाबा, खरेंच किती तरी दिवसांपासून राणीच्या बागेत जाण्याचा बेत अ चालला आहे; पण अजून कांहीं जाणें झालें नाहीं. या रविवारी चला ना आपण सगळेच जाऊं. " 66 वामनराव ह्मणाले, “रविवारी तर मला मुळींच यावयाला व्हावयाचें नाहीं. " नंतर ते मुकुंदकडे वळून हाणाले, " मिस्तर मुकुंद, या रवि- वारी मालती, मदन आणि वसंत यांना घेऊन तुम्हीं राणीच्या बागेत घेऊन •जाना! त्यांना नीट सगळे दाखवा आणि समजावूनहि द्या. " प्रफुलतेनें भुकुंद ह्मणाला, “ हो, हो, मोठ्या आनंदानें, इंग्लंडांत असतां ब्रिटिश म्युझिअम, हाईडपार्क वगैरे पाहण्यासारखी ठिकाणें मीं गेल्याबरोबर पाहिलीं; पण त्यांत विशेष असे मला कांही वाटले नाहीं. पुढे मी आणि लॉर्ड मिलफोर्ड यांची मुलगी मिस एमा असे उभयतां न्युझिअम पाहण्यास गेलो असतां त्या मुलीने एकेका वस्तूची माहिती करून देऊन जेव्हां ती ती वस्तु मला दाखविली, तेव्हां मी देग्वील आश्चर्यानें थक्क होऊन गेलो. तेव्हांपासून असलीं विशेष ठिकाणे पहाव- याची कशीं याचा मी थोडासा अभ्यासच केला. येथल्या राणीच्या बागेत देखील पुष्कळ लोक जातात आणि येतात; पण चिकित्सक बुद्धीने पाह- णारे असे फारच थोडे असतात. असे बाग पहात असतां वनस्पतिशा- स्त्राची माहिती फार चांगली होते. मी येत्या रविवारी या सर्वांना अवश्य घेऊन जाईन. मालती हंसत हंसत ह्मणाली, पहा, मग विसराल हो. " मुकुंदहि हंसून व मालतीकडे पाहून ह्मणाला, “ छेः, छेः ! त्याची तुह्मांला काळजी नको. दुपारी दोन वाजतां मी माझी स्वतःचीच गाडी घेऊन येतों, " 66
पान:सुखाचा शोध.pdf/१५५
Appearance