पान:सुखाचा शोध.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ 66 मुकुंद म्हणाला, हॅम्लेटची. " वामनराव कांहींच बोलले नाहीत; पण मालती मोठ्या कौतुकानें म्हणाली, मग पुढे काय झालें ?” (6 सुखाचा शोध. 66 मुकुंद म्हणाला, त्या दिवशी माझी ती हॅम्लेटची भूमिका फारच चांगली उठली. सर हेनरी आरव्हिंग शेवटपर्यंत बसले होते. प्रयोग संपल्यावर त्यांनी मला बोलावले आणि माझ्याशी शेकह्यांड करून मला आपल्याजवळ बसविले, " मालतीची जिज्ञासा अधिकच वाढली. ती म्हणाली, "पुढे काय झाले ?” मुकुंद म्हणाला, माझ्या एकंदर भूमिकेचें परीक्षण करून त्यांनीं मला माझे थोडे दोप दाखविले. नंतर ते मला म्हणाले, 'मिस्तर मुकुंद, आपण जर या आमच्या नाटकाच्या धंद्यांत पडाल, तर लवकरच माझा पहिला नंबर आपण पटकवाल आणि मला दुसऱ्या नंबरावर जाऊन बसावे लागेल.' मी लागलीच त्यांची ती स्तुति सव्याज परत करून 'तुम्हांला ही भीति बाळगण्याचे कारण नाहीं' म्हणून सांगितलें. आमच्या देशांत हा धंदा फार कमी प्रतीचा समजतात, असे जेव्हां मी त्यांना सांगितले, तेव्हां तर त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाहीं. यानंतर त्यांच्या व माझ्या अनेक मुलाखती झाल्या. तसेच त्यांच्यामुळे इंग्लंडांतील कांहीं वड्या बड्या गृहस्थांच्याहि ओळखी झाल्या. 22 " वामनराव संतुष्ट झाल्यासारखे दाखवून म्हणाले, " खरोखर आपण आपला वेळ इंग्लंडांत फार चांगल्या रीतीने घालविला. सर हेनरी आर- व्हिंगसारख्या बड्या गृहस्थानें आपली स्तुति केली, यावरून आपली योग्यता सहज समजते. " मालती म्हणाली, “ त्यांनी हा तुमचा गौरव केला असे म्हणण्यापेक्षां आमच्या हिंदुस्थानाचाच गौरव केला, असे म्हटले पाहिजे, नाहीं मास्तर ?" मास्तर - दिनकर - काय आपले कपाळ सांगणार ? मास्तर इतके दिवस मालतीकडे महाराष्ट्र गौरव म्हणून प्रसिद्ध होते; पण आतां त्यांच्याहि वरची अशी ही व्यारिस्टर साहेबांची 'भारत गौरवा मूर्ति आल्यामुळे विचान्या दिनकरच्या अंतःकरणाची तळमळ सुरू झाली होती. वळेंच