पान:सुखाचा शोध.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. १४९ यांनी जे काय सांगितले त्यावरून हे रसिक वे बुद्धिमान् गृहस्थ आहेत, अशी माझी खात्री होऊन चुकली आहे. यांच्यासारख्या विद्वान् गृहस्थानें विलायतेस जाऊन आतां तिकडील ज्ञानोदधि मंथन करावा, असे मला वाटतें. यामुळे यांचा तर फायदा होईलच पण आमच्या देशाचेंहि पुष्कळ हित होईल, " वामनराव कांहीं बोलण्याच्या आधींच मालती हाणाली, " तुझी ह्मणतां तें खरें; पण विलायतेस जाण्याला ते तयार होतील की नाहीं, याची मोठी शंका आहे. ते कांहीं तुमच्या आमच्यासारखे हिंदु नाहींत, ते पके हिंदु आहेत. " असे ह्मणून मालती हंसूं लागली. मुकुंदलाहि हंसूं आलें. तो ह्मणाला, "ती शंका मला यांना पाहतांच यांच्या पोपाखावरून आली. " 66 दिनकर हाणाला, आमच्या राष्ट्राचा जो पोषाख आहे, तो मी करतो. ह्यांत अनुचित ते काय ? उलट परक्रियांच्या पोषाखाने नटणें ह्मणजे आझांला आमच्या राष्ट्राचा अभिमान नाहीं, असें कबूल करण्या- सारखे आहे." विलायतेस जाण्याची मला देखील पुष्कळ इच्छा आहे; पण पैशाच्या अडचणीमुळे मला अद्याप त्या बाबतीत कांहीं करता आले नाहीं. आतां आपण ज्ञानाच्या संबंधाने हाणाल, तर ते इकडे संपादन करतां येणार नाही, असे कांहीं नाहीं. तसा प्रयत्न मात्र झाला पाहिजे. टेम्स नदीच्या पाण्याने स्नान केल्यावांचून खरें ज्ञान प्राप्त होत नाहीं, ही समजूत ह्मणजे अमुक तीर्थावर स्नान केले असतां मुक्ति मिळते; हे मानणान्या हिंदुप्रमाणेच अंधश्रद्धेचे आहे. पण आम्ही हिंदूंना हंसतो, यांना मात्र हंसत नाहीं. सिव्हिलसर्विसची परिक्षा हिंदुस्थानांत सुरू झाली, तर पुष्कळ तरुण सिव्हिलियन होतील; पण ती सोय नसल्यामुळे टेम्सच्या कांठी तर्पण करण्यास जावे लागते. यामुळे इकडच्या दरिद्री; पण बुद्धि- वान् गृहस्थांपेक्षां मढ; पण श्रीमान् गृस्थच सिव्हिलियनची अथवा तिकडच्या अन्य परीक्षा देऊन येतात. आतां इतके खरें कीं, पाश्चात्य लोक शिक्षणा- च्या बाबतींत आमच्यापेक्षां पुष्कळ पुढे आहेत आणि तिकडे शिकविण्या-