१५० सुखाचा शोध. च्या पद्धतीहि फार चांगल्या असतील. आमच्या इकडचीं कालेजें ह्मणजे नौकर तयार करणारे कारखाने आहेत. स्वतंत्र बुद्धिमत्तेची माणसें पैदा व्हावीत अशी शिकविण्याची पद्धतीच नाहीं. असे असूनहि इकडे रानडे, टिळक, प्रो. बोस यांसारखी माणसे पैदा झालीं आहेत, हे लक्षांत ठेवण्या- सारखे आहे. इंग्लंडप्रमाणे इकडचेंहि शिक्षण अगदीं स्वतंत्र असे होईल, तर इकडे अनेक बुद्धिमान् लोक आहेत, असं दिसून आल्यावांचून राहणार नाहीं. " दिनकरच्या या म्हणण्यास चांगले उत्तर देऊन या छोट्या सभेत आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करावें, असें मुकुंदला फार वाटलें; पण त्या वेळीं त्याची समयसूचकता त्याला तितकी प्रसन्न झाली नाहीं. तेव्हां अर्थातच त्याला दिनकरचें म्हणणे थोडेबहुत कबूल करावे लागले. तो म्हणाला, 66 माझ्या बोलण्याचा अर्थ आपण निराळा केला, असे दिसतें, आपल्या देशांत विद्वान् लोक नाहीत, असे कांहीं मी म्हणत नाहीं; पण हेच लोक जर विलायतेस जाऊन तेथील विद्वानांच्या सहवासांत कांहीं दिवस राह- तील, तर विद्वत्ता तिकडे कशी पाणी भरीत आहे, हे आपणास दिसून येईल. ज्ञान संपादन करण्याची तिकडे जीं विविध साधनें आहेत, त्यांची आपणास इकडे नुसती कल्पनाहि करता येणार नाहीं. शिल्प आणि विज्ञान हीं दोन्ही जणूं तिकडे सजीव दिसतात. सरस्वती प्रत्यक्ष सशरीर तेथें नांदत आहे, असे वाटतें." दिनकर कांहींच बोलला नाहीं. वामनराव म्हणाले, तुमचें म्हणणं खरें दिसतें. आमच्या इकडच्या शिक्षणांत सजीवता म्हणून नाहीं, " खुपींत येऊन मुकुंद म्हणाला, " फार लांब पहावयाला नको. आमच्या कॉलेजांतून शेक्स्पीयरची नाटके वाचतात; पण तीं आम्हांला किती तरी निर्जीव वाटतात. हींच नाटकें इंग्लंडांतल्या कॉलेजांत आपण शिकूं लागलों म्हणजे शेक्स्पीयरच्या नाटकांतील प्रत्येक व्यक्ति आपणापुढें सजीव उभी राहून तीच जणूं आपले मनोगत सांगत आहे, असे वाटतें. शिवाय थियेटरांतून होणारी नाटकें. नाट्यकलेचें इतकें उज्ज्वल स्वरूप इंग्लंड शिवाय दुसऱ्या कोठेंहिं पहावयाला मिळावयाचें नाहीं. इकडील विद्यार्थ्यांनीं 66
पान:सुखाचा शोध.pdf/१५०
Appearance