Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ सुखाचा शोध. in profuse Strains of. Unpremeditated art.' असें ह्मणून मुकुंदनें एकवार दिनकरकडे आणि एकवार मालतीकडे मोठ्या अभिमानाने पाहिले. दिनकर ह्मणाला, "पण या 'कोकिळ' कवितें- त त्याहिपेक्षां उच्च कल्पना आहेत. पक्षी आकाशांत जो जो उंच भराज्या मारीत आहेत, तो तो त्याप्रमाणें कवीच्या कल्पनाहि अधिक उच्च होत गेल्या आहेत. वर्डस्वर्थच्या Cuckoo कवितेशीं या 'कोकिळ' कवितेची चांगली तुलना करतां येण्यासारखी आहे. कोकिळाच्या स्वराला मुग्ध होऊन वर्डस्वर्थ त्याला Aninvisibie think, a voice, a mystery ह्मणून थांबला आहे; पण शेलेनें त्यावर ताण केली आहे. पक्षी आणि मनुष्य यांची तुलना करून तो ह्मणतो. " ‘ Our sweetest songs are those That tell of saddest thonght. आपली गुणग्राहकता प्रगट करण्याच्या उद्देशाने मुकुंद हाणाला, "खरोखर आपलें हैं काव्यविवेचन मला फार आवडले. शेलेची काव्ये मला देखील फार आवडतात. आपण फार बहुश्रुत असून आपले वाचनहि फार दांडगें दिसतें. आपल्या ओळखीनें मला फार आनंद झाला. आपण हल्ली काय करीत असतां! " 66 दिनकर कांहीं उत्तर देणार तोच त्या खोलींत वामनराव आपल्या दोघां मुलांना बरोबर घेऊन तेथें आले. त्यांना पाहतांच दिनकर खुर्चीवरून उठला आणि त्यानें वामरावांना नमस्कार केला. वामनरावांनीहि त्याला उलट नमस्कार करून वसण्याविषयीं सुचविलें. ते मुकुंदला हाणाले, तुह्मीं केव्हां आलां ? दिनकररावचा आणि तुमचा चांगला परिचय नाहीं असे दिसते ? यांच्याशीं तुझीं अवश्य ओळख करून व्या. हे फार विद्वान् गृहस्थ आहेत. नुकतेच एम्. ए. झाले आहेत. यांची वृत्ति सरळ, तेजस्वी व सत्याग्रही असून तसेच ते अंतःकरणाचे फार थोर आहेत. " मुकुंद हंसून ह्मणाला, "तुझी ह्मणतां त्याचा अनुभव मला नुकताच आला. शेले व वर्डस्वर्थ या दोघां कवीसंबंधानेंच आहीं बोलत होतो.