Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. १४७ नुसतें गातांच येतें; पण तुम्हीं कवियत्री आहां ! तुमचा एकंदर आयुष्य क्रमच मला काव्यमय वाटतो. तुमच्या त्या कविता मला पहावयाला मिळ तील का ? " मालती विनोदानें तो अंक आपल्या मागे लपवून धरून हंसत हंसत ह्मणाली, “छे: छे:! त्या कविता आपण पहाव्या इतक्या योग्यतेच्या नाहीत. आपण त्या पाहून मला हंसाल. " मुकुंदहि कांहीं इतका अरसिक नव्हता. खुर्चीवरून उठून त्यानें हंसत हंसत तो अंक मालतीच्या हातांतून काढून घेतला आणि तिच्याकडे थोडें विनोदानें तो ह्मणाला, पाहून 66 आपल्या कवितांना हंसेन इतका कांहीं मी अरसिक नाहीं; आणि आपल्या कविता इतक्या अप्रबुद्ध असत्या, तर त्या संपादकानें छापल्याच नसत्या. " नंतर तो दिनकरकडे वळून ह्मणाला, " कायहो, मी ह्मणतों तें खरेना ? कोणत्या विषयासंबंधानें या कविता केल्या आहेत ? " या वेळी दिनकरची स्थिति मोठी अनुकंपनीय झाली होती. केव्हां कल्पनाहि नसलेला प्रसंग आपण पहात आहों, असे वाटून त्याची सहन- शीलता कसाला लागण्याच्या बेतांत आली होती. मुकुंदचा वरील प्रश्न ऐकून तो कांहींसा उदसीनतेनें ह्मणाला, " या कवितावर 'कोकिळ ' असें शिरोनाम आहे. शेले कविच्या 'स्कायलार्क' कवितांवरून ह्या कविता रचलेल्या आहेत; पण त्या कवितांचा हा केवळ अनुवाद नसून स्वतंत्र विचार असे पुष्कळ आहेत आणि त्यावरून कवियत्रीची प्रतिभा चांगली दिसून येते. " काव्यानंदानें अगदीं बेहोप होऊन मुकुंद ह्मणाला, "ओ, स्कायलार्क स्कायलार्क ! अहाहा ! किती गोड कविता त्या, आणि त्यांतले काव्य तरी किती रम्य ! Hail to thee, blithe Spirit ! Bird thou never wert, That from heaven or near it, Pourest thy full heart