पान:सुखाचा शोध.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोधं. कर त्या खुर्चीवर बसल्यावर मालती आपल्या खुर्चीवर बसून मुकुंदला म्हणाली, " हे आमचे मास्तर. हो, पण आतां माजी मास्तर. कारण हे हल्लीं एका श्रीमान् गृहस्थांचे प्रायव्हेट सेक्रेटरी असून यांचे धाकटे बंधु आम्हांला शिकवावयाला येत असतात. " दिनकरची ही अशी माहिती मालतीनें मुकुंदला करून दिल्यावर त्यानें प्रसन्न दृष्टीनें दिनकरकडे पाहून युरोपियन पद्धतीप्रमाणे किंचित मस्तक लवावले आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. दिनकरनेंहि स्मित करून हात पुढे केला आणि मुकुंदशीं हस्तांदोलन केलें. इतका वेळ मुकुंदचा भाषणओघ जो अविरतपणें वहात होता, तो अर्थातच दिनकरच्या आग- मनामुळे थांबला. दिनकरचें तें सुदृढ शरीर, त्याचा तो गोरा वर्ण आणि तेजस्त्री व रुवाबदार चेहरा हीं पाहून मुकुंदसारख्या काळ्या साहेबाला साहजिक थोडें चमत्कारिक वाटले, थोडा वेळ या सभेनें मौनच स्वीकारले होतें. कोणी बोलत नाहीं, असे पाहून दिनकर भालतीला म्हणाला, "तुझांला देण्यासाठी आज एक आनंददायक वस्तु आणली आहे.” असें ह्मणून दिनकरनें राष्ट्रदीप मासिकाचा अंक मालतीच्या हाती दिला. त्या अंकावर वर वर नजर टाकून तो तसाच तिनें हातांत धरला आणि श्यांत कांहीं विशेष नाहीं. असे दर्शवून ती हलणाली, " त्या कविता वाटतें ! इतक्या दिवसांनी माझे भाग्य मुप्रसन्न झाले म्हणावयाचें ? याबद्दल त्या संपादकाचे उपकार मानले पाहिजेत आणि आपले उपकार मानले पाहिजेत. इतक्या तांतडीने हा अंक कशाला आणला? आणखी चार दिवसांनी आमचा " आलाच असता. अरेरे ! किती आशेनें आणि केवढ्या उत्सुकतेनें तो अंक घेऊन दिन- कर आला होता ! तो अंक पाहतांच मालतीला किती तरी संतोप होईल आणि त्यामुळे मजविपयीं तिला कितीतरी आदर वाटेल, अशी मनो- राज्याची इमारत दिनकरनें बांधली होती; परंतु मालतीनें त्याला अगदी ना- उमेद करून टाकले. इकडे मुकुंदला मात्र खरोखर फार आनंद झाला. मालती कविता करते, हें ऐकून त्याला का आनंद होणार नाहीं? तो माल- तीकडे आनंदानें व आश्चर्याने पाहून हाणाला, “ अंः ! मला वाटले तुह्मांला