प्रकरण अकरावें. १४५ 66 गौरवच केला असे वाटून मालती हाणाली, “पियोनो वाजविण्यांत आपण खरोखर अद्वितीय आहां. पडद्यावरून आपली बोटे कशीं यंत्रासारखी फिरतात. माझा हात तसा चालत नाहीं. आपण शिकवाल का ? " " हो हो ! मोठ्या आनंदानें. तुझी फार थोड्या दिवसांत तयार व्हाल अशी माझी समजूत आहे. मला देखील प्रथम चांगला वाजवितां येत नव्हता आणि त्यामुळे माझी लॉर्ड मिलफोर्ड यांच्या येथे एकदां चांगली फजिती झाली. त्यांची कन्या मिस एमा पियानो अप्रतीम वाजविते. तिने आपण होऊन पियोना वाजविण्यास शिकण्याचा मला आग्रह केला. मी तिच्याच जवळ शिकलो. थोडे दिवस चांगली मेहनत घेतल्यावर माझी या विद्येत बरीच गति झाली. तुझी देखील लवकरच शिकाल. त्यांत विशेष कठिण नाहीं. असे ह्मणून मुकुंदनें जाकिटाच्या खिशांतून एक लहानसा रेशमी रुमाल काढला आणि त्याचा दोन तीन वेळां वास घेतला. नंतर तोच रुमाल मालतीच्या नाकाजवळ नेऊन झणाला, या सेंटचा वास किती सुंदर आहे, हे पाहिलेत का ? इंग्लंडांत एका श्रीमान् डचेसच्या घरीं बॉल- साठी गेलो असतां तिनें हा सेंट शिंपडून मला नजर केला. याला वर्ष होऊन गेलें, तरी वास अजून तसाच कायम आहे. 66 "" मालतीनें तो रुमाल मुकुंदच्या हातांतून घेऊन त्याचा नाजुकपणा पाहिला आणि त्याचा वास घेऊन म्हणाली, " खरोखर मोठा मनोहर वास आहे. इकडे कांहीं असलें सुवासिक सेन्ट मिळत नाहीत." असे म्हणून मालती तो रुमाल परत देऊं लागली; परंतु तो परत घेण्याचें नाकारून मुकुंदनें आपल्या हाताने मालतीच्या खिशांत तो ठेवला. बिचारा दिनकर हा सर्व प्रकार दुरून इतका वेळ कांहींसा शांतपणे पहात होता; पण या पुढे तसेच स्वस्थ बसणें त्याला अशक्य झाले. तो तसाच उठला आणि त्या प्रकाराकडे आपले लक्षच नाहीं, असे दाखवून मालतीच्या खोलीकडे गेला. कोणी परका पुरुष इकडे येत आहे, हे पाहून मुकुंदने कांहींस रावून दिनकरकडे पाहिले आणि तशाच अर्थाने त्यानें मालतीवरहि नजर टाकली. दिनकरला पाहतांच मालती खुर्चीवरून उठली आणि दिनकरकडे एक खुर्ची सरकावून म्हणाली, "या दिनकरराव, बसा." त्याप्रमाणें दिन-
पान:सुखाचा शोध.pdf/१४५
Appearance