पान:सुखाचा शोध.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ सुखाचा शोध. कडे एकाग्र दृष्टीने पहात होता; पण मालतीचें लक्ष त्याच्याकडे गेलें नाहीं. ती गाण्यांत व तो तरुण वाजविण्यांत अगदी तल्लीन झाली होतीं. दिनकरलाहि पुढे जाण्यास धैर्य होईना. आपल्या जाण्यानें रसभंग होईल, अशी त्याला भीति वाटून तो मुलांची अभ्यासाची जी खोली होती, त्या खोलीत जाऊन बसला. या वेळीं मालतीचे ते आलाप किती तरी मधुर होते; पण दिनकरला ते आज तितके रम्य वाटले नाहींत. उलट त्यामुळे त्याची हुरहुर वाढत जाऊन शरीरांतली उष्णताहि वाढत होती. हा मत्स. राचा तर परिणाम नसेल ना ? अशी देखील एक वेळ दिनकरला शंका आली; पण तिचा त्यानें फारसा विचार केला नाहीं. इतक्यांत गायन संपले. पियानोचे सूरहि थांबले. तो तरुण आनंदानें हुरळून जाऊन मोठ्यानें ह्मणाला, वा ! फार उत्तम, फार उत्तम ! मिस मालती, तुमचा आवाज खरोखर कोकिलेच्या आवाजासारखा हृदय हलवून सोडणारा आहे. म्हण ण्याची पद्धतहि फार चांगली आहे. इंग्लंडांत देखील इतक्या मधुर कंठाचे गायन मी मिस रोजर्लिंड शिवाय दुसऱ्या कोणाचे ऐकलेले मला स्मरत नाहीं. तुमच्या आवाजांत जी एक निकोप तानेची लकेर आहे, ती मात्र तिच्या आवाजांत नव्हती. " 66 वरील स्तुतीमुळे लाजल्यासारखे करून मालती हंसत हंसत ह्मणाली, आपण माझी निष्कारण स्तुति करतां. मला खरोखरच इतकें कांहीं चांगलें गातां येत नाही. आपण मघां जिचें नांव घेतलें, ती मिस रोजलिंड कोण ? मुकुंद आश्चर्याने हंसून हाणाला, "आं ! मिस रोजलिंडचें नांव तुझी अद्याप ऐकलें नाहीं ? ललितकलांना वाहिलेली इंग्लंडांतली मासिक जर तुझी वाचीत असतां, तर तिच्याविषयीं तुझांला पुष्कळ माहिती झाली असती. ती अभिनयकुशल व गानकुशल प्रसिद्ध नर्तकी असून एका श्रीमान् नाटक मंडळीकडून तिला दरमहा शेकडों पौंड मिळतात. तुझी देखील आपला गाण्याचा अभ्यास असाच चालू ठेवा, म्हणजे ही गायन- कला तुझांला देखील चांगली वश होईल. >> या स्तुतींत खरें तात्पर्य कितीहि असो; पण त्यामुळे आपला मुकुंदनें 46