Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ सुखाचा शोध. व्हावें असें खूळ शेटजींच्या डोक्यांत शिरलें व तेवढ्यासाठी ते इंग्रजी शिक विणारा मास्तर शोधूं लागले. इंग्लिश भाषेंत चांगले प्राविण्य संपादन केल्यावर एक विलायतची सफर करावयाची असाहि शेटजींनी संकल्प केला होता. हळू हळू या गुजराथी शेटजींचा दक्षिणी सुधारकाशी परिचय झाल्यावर त्यांनी आपणास एक चांगला शिक्षक मिळवून देण्याविषयीं या मंडळींतील विशेष परिचयाच्या गृहस्थांना विनंति केली. दिनकर एम. ए. होऊन पुढे काय करावें या विवंचनेत आहे, ही गोष्ट वामनरावांना माहीत असल्यामुळे त्यांनीं दिनकरला शेटजीकडे नौकरी लावून दिली आणि दिन- करचा धाकटा भाऊ दिवाकर, याला आपल्या मुलांना शिकविण्यास सांगि- तले. ही नौकरी दिनकरला फार चांगली मिळाली होती; पण स्वतः दिनकरनें थोड्या नाखुषीनेंच ही नौकरी पत्करली होती. शेटजींचे प्राय- व्हेट सेक्रेटरी व शिक्षक अशी दोन नातीं या नौकरींत होतीं. पगार शंभर रुपये. शिवाय शेटजींच्याच घरीं चोविस तास रहावयाचे असल्यामुळे दिनकरचा सगळा कच्चा खर्च शेटजींनींच पत्करला होता. सकाळी सात ते नऊ शेटजींना शिकवावयाचें. बाकी दोन्ही वेळां शेटजींच्या पंक्तीला जेवून त्यांच्याबरोबर गाडी-मोटारी मधून हिंडावयाचें; एवढेंच दिनकरला काम होते. दिनकरच्या या नौकरीचा पुष्कळ एम. ए. झालेल्या गृहस्थांना खरोखर हेवा वाटत होता; पण आश्चर्य हें कीं, स्वतः दिनकर मात्र दुर्मु- खलेला होता, आणि याचे कारण काय, तर मालतीची आणि त्याची झालेली ताटातूट. मालतीची आणि त्याची ताटातूट शिवाय इतरांना सांगता येणार नाहीं. झाली होती; याचा अर्थ दिनकर- फार काय; पण स्वतः मालतीला देखील या ताटातुटीचा अर्थ समजला नसता; परंतु दिनकर मात्र त्या ताटातुटीवर विरहाची कवने करूं लागला होता. वास्तविक दिनकरला वामनरावांकडे जाण्यास मनाई होती, असें कांहीं नाहीं. तो दिवसांतून तेथे दहा वेळां गेला, तरी त्याला तेथें कोणी प्रतिबंध करणारें नव्हतें; परंतु 'कां आलां' असे कोणी विचारलें, तर त्याला जबाव काय देणार, या 6 भीतीमुळे मालतीकडे जाण्यास त्याचें मन मागे घेत असे. तरी आठ दहा