Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. १४१ वरहि पाळी आली. प्रथम तिनें भीतभीतच एक पद झटले; परंतु तिचा तो गोड आवाज, पद्धतशीर झणणें आणि तिचे स्वभावतःच मनोहर असे आलाप यामुळे ते गाणे सर्वांना आवडून इतका वेळ झालेली गाणी अर्थातच फिक्क पडली. मालतीला आणखी पद्ये ह्मणण्याविषयीं आग्रह होऊं लागला. आतां तिची भीति बरीच कमी झाल्यामुळे तिनें आणखी दोन तीन गाणीं फारच बहारदार झटलीं. अगोदरच मालतविर मुकुंदचें मन आकृष्ट झाले होते. त्यांत आणखी तिची संगीतांतली ही गति पाहून मुकुंद तिच्याभोवती त्या रात्रीं मधमाशीसारखा हिंडूं लागला. लीलेला तर वाईट वाटलेंच; पण आमच्या भामिनीबाई पांडे यांच्या विमले- ला किती वाईट वाटले असेल, याची कल्पनाच केली पाहिजे. यानंतर बागत युरोपियन पद्धतीप्रमाणे अल्प उपहार होऊन सर्व आमंत्रित मंडळी मुकुंदला दीर्घायुष्य चिंतून घरोघर निघून गेली. घडलेल्या एकंदर प्रकारा- चा मुकुंदच्या व मालतीच्या मनावर काय परिणाम झाला होता, तें त्यांचे त्यांनाच माहीत. तथापि इतकें खरें कीं त्या रात्री दोघांनाहि चांगली झोप लागली नाहीं. याबद्दल प्रकरण अकरावें. % मागील प्रकरणांत सांगितलेल्या गार्डन पार्टीला एक महिना लोटून गेला होता. या एका महिन्यांत दिनकरच्या संबंधानें त्याच्या दृष्टीने थोडी नावडती अशी एक गोष्ट घडून आली होती. मुंबईच्या एका श्रीमान् गुजराथी गृहस्थास इंग्रजी शिकण्याची हुक्की आली. हे गृहस्थ सट्टेवाजीच्या धंद्यांत वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी अकल्पित रीतीनें लक्षाधिश झाले होते. हातांत पैसा खेळू लागल्यावर शेटजीनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने अनेक धंद्यांत यश मिळविले आणि मागचें सगळे अपयश धुवून टाकले. हातांत पैसा असल्यावर बाजारांतल्या कीर्तीच्या दुकानांतून कीर्ति मिळ.. विण्यास कितीसा वेळ लागणार ! शेटजीहि त्याप्रमाणें कीर्तिमान् झाले; परंतु सरकार दरबारीहि आपणास चांगला मान मिळून आपण नामदार