पान:सुखाचा शोध.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० सुखाचा शोध. मला पियानो वाजविण्यांत तरबेज करून सोडलें. हळू हळू लॉर्ड साहेबां- च्या एकंदर कुटुंबाशी माझा फार परिचय झाला. त्यांचे वडील चिरंजीव मला बरोबर घेतल्यावांचून हाइडपार्कमध्ये फिरावयाला जात नसत.” मुकुंदनें ही स्वतःची टिमकी वाजवीत असतां किती वेळां तरी आपली नजर मालतीकडे फिरविली होती. विमलेला हें सहन झाले नाही; पण मुकुंदची दृष्टि स्वतःकडे कशी आकर्पून घ्यावी हैं तिला समजेना. लीले- लाहि तें आवडलें नाहीं. ती मुकुंदला ह्मणाली, “ हे तुमचे लॉर्ड मिल- फोर्ड अस्सल लॉर्ड की नकली लॉर्ड ? " " आपण युक्तिवाद करण्यांत मुकुंदहि कांहीं कमी नव्हता. तो झणाला, कल्पना करूं की ते नकली लॉर्ड आहेत. तरी पण हिंदुस्तानांतल्या अस्सल लॉडर्डापेक्षा त्यांची योग्यता खचित अधिक ठरेल. " मुकुंदचें हें भाषण ऐकून सगळ्या स्त्रिया हंसूं लागल्या. लीलेचा चेहरा मात्र बराच लाल झाला. भामिनीबाईना ही संधि वरी आहे, असें वाटून त्यांनी पियानो वाजविण्याविषयी मुकुंदला आग्रह केला. ती ह्मणाली, तुझी पियानो वाजवा. माझी विमला पियानोवर इंग्रजी गीतें फार चांगली म्हणते. " ( भामिनीवाईचे हे शब्द ऐकून सगळ्याजणींनी एकवार विमलेकडे पाहिले आणि नंतर त्या एकमेकींकडे पाहून उपहासानें हंसल्या. मुकुंद- लाहि असली कांहीं गम्मत पाहिजेच होती. त्यानें लागलीच पियानो वाज- विण्यास आरंभ केला आणि तो विमलेकडे 'गा' अशा आज्ञाधीन पाहू लागला. भामिनीयाईहि तिला उत्तेजन देऊ लागल्या. म्हण, म्हण, हें म्हण ' असे त्या तिला सुचवूं लागल्या. शेवटी कांपन्या व वेसूर सुरांत ‘ लॉ लॉ ला रॉ रॉ रॉ' असे कांही गाणे तिने म्हटले, तें कर्णकटू संगीत ऐकून पुन्हां सगळ्याजणी हंसल्या. मुकुंदने पियानो वाजविण्याचे बंद करून वाजाची पेटी वाजविण्यास आरंभ केला आणि लीलेला संगितां- तलों पद्ये झणण्यास विनंति केली. आपण फार चांगलीं पधें म्हणतों, असा लीलेला अभिमान होता. तिने एक पद म्हणून नंतर दुसऱ्या एका स्त्रीला गाणे ह्मणण्याविषयीं सुचविलें. या क्रमानें लवकरच मालती-