Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावे १३९ बागत होती आणि मधून मधून तिची आईहि तिला सुचवीत होती. मुकुंद- कडे पाहून हंसावयाचें, मुरडावयाचें वगैरे अनेक चेष्टा ती करीत होती. मुकुंदनें कोणालाहि विचारलें, तरी मध्यें तोंड घालून विमलेकडून उत्तर मिळत असे. अशा रीतीनें विमलेनें प्रयत्नाची पराकाष्ठा केली; पण हा माकडछाप माल मुकुंदच्या पसंतीस पडण्याचीं कांहीं चिन्हें दिसेनात. इतक्यांत या समाजांत मालती आल्यानें तर विमला अगदीच मागे पडली; परंतु भामिनी पांडे अशा रीतीनें आलेली ही संधी गमावण्यास तयार नव्हत्या. त्या मुकुंदकडे वळून ह्मणाल्या, “ आमची विमला पियानो फार उत्तम वाजविते. आपणहि वाजवीत असाल ? " मुकुंदला आपले स्वतःचें स्तुतिस्तोत्र गाण्याचा आजच्यासारखा सुप्रसंग या पूर्वी केव्हांहि आलेला नसल्यामुळे 'बालिश बायकांत बहु बडबडला ' या न्यायानें त्यानें आज आपली जीभ यंत्राप्रमाणे चालविली होती. त्याच्या अंगीं अनेक दोष असतील; पण तो फार गोड व मोहक बोलणारा होता. तसेच इंग्लडांत असतां त्यानें शिक्षणापेक्षां ख्याली खुशालीकडेच अधिक लक्ष दिले होतें. तिकडच्या नाटक तमाशांत त्यानें रात्रीच्या रात्री घाल- विल्या असून हलक्या लोकांच्या नाचगाण्याच्या मैफलींतहि तो वारंवार भाग घेत असे. या क्रमानें त्याला पियानो चांगल्या रीतीने वाजवितां येत असे. बाजाची पेटीहि बाजवीत असे. हे जरी गुण असले, तरी इक- डच्या एकाद्या नाटक्याच्या अंगींहि हे गुण असतां, जी किंमत देतों, तितकीच विलायतेस मुकुंदच्या या गुणाला गृहस्थां- कडून किंमत मिळत होती. परंतु विलायतेहून आल्यामुळे मुकुंदचे हेच गुण इकडच्या सुधारकांना अत्यंत श्रद्धेय वाटू लागले. भामिनीबाई पांडे यांनीं मुकुंदला तसा प्रश्न करतांच तो ह्मणाला, मला प्रथम पियानो वाजवितां येत नव्हता. इंग्लंडांत गेल्यावर मी शिकलों. एके दिवशीं लॉर्ड मिलफोर्ड यांच्या घरी मला बॉलसाठी बोलाविले होतें तेथें माझी लॉर्ड साहेबांची मुलगी मिस एमाशी ओळख झाली. ती खरोखरच अप्र- तिम पियानो वाजविते. पियानो शिकविण्याबद्दल मी तिला भीतभीतच विनंति केली होती; पण ती तिनें मोठ्या आनंदानें मान्य केली आणि त्याला आपण 66