१३८ सुखाचा शोध. · इतका वेळ त्याचें बरेंच मेतकुट जमलेले असल्यामुळे तो तिला सहज हंसून म्हणाला, " मिस लीला, ती एक तरुणी पहा, कशी 'वॉल प्लावर सारखी तेथें उगीच बसून राहिली आहे. तिला इकडे आपल्या मंडळींत घेऊन या, " विलायतेहून परतलेल्या गृहस्थानें एका बी. ए. झालेल्या त्यांतून अविवाहित तरुणीवरून लक्ष काढून ते दुसऱ्या एका तरुणीवर ठेवावें, हें मिस लीला यांना अर्थातच रुचलें नाहीं; पण मालतीला बोलावून आणून आपण तिच्यापेक्षांहि श्रेष्ठ आहों, हें मुकुंदला पटवून दिल्यावांचूनहि तिला राहवेना. ती मालतीजवळ गेली आणि हंसत हंसत हाणाली, आपलेच नांव मालती ना ? आपल्याला आंत बोलावून न्यावयाचें विस्मृतीने राहूनच गेलें. या, आंत या, मी आपली सगळ्यांशी ओळख करून देतें." 66 मालतीचा नाइलाज झाला. ती उठली आणि लीलाबरोबर आंत गेली. आंतल्या दिवाणखान्यांत जांताच मिस लीला मुकुंदजवळ जावून म्हणाली, " मिस्तर मुकुंद, ही वामनरावांची कन्या मिस मालती." मुकुंदनें हंसत हंसत आपला हात पुढे केला. इच्छा नसतां मालतीनेंहि आपला हात पुढे केला आणि ब्यारिस्टरसाहेबाशी हस्तांदोलन केलें. लीला मोठ्या अभिमानानें या वेळीं मालतीला म्हणाली, " मी बी. ए. झाल्यें. तेव्हां तुम्ही इंग्रजी सद्दाबींत होतां, आतां बहुतकरून कॉलेजांत जात असाल १ " मालती नम्रतेने म्हणाली, "नाहीं. मी यंदा म्याट्रिकला बसणार आहे." अशा रीतीनें लीलेनें आपले प्रभुत्व पुन्हां स्त्रीसमाजांत प्रस्थापित केलें. या समारंभासाठी भामिनीबाई पांडे आणि त्यांची कन्या विमला या दोघी आल्या होत्या; हें वर सांगितलेच आहे. विमलेनें आज विलक्षण नट्टा पट्टा केला होता. कासोट्याला २जा देऊन पार्शी स्त्रियांप्रमाणे ती रेशमी साडी नेसून आली होती. शिवाय चष्मा, रिस्टवॉच, पोलकें, बूट वगैरे बाबतींतहि तिनें सर्वांवर ताण केली होती. पांढऱ्या पावडरीनें चेहराहि रंगबिला होता; तथापि तिच्या चेहऱ्याचें एकंदर वळण मुकुंदच्या हृदयावर उमटत आहे, असे कांहीं दिसेना. विमलाहि अगदीं सावधपणेंच
पान:सुखाचा शोध.pdf/१३८
Appearance