१२४ सुखाचा शोध. विचारा बाबू त्या मोलकरणीकडे त्रासून पाहून डोळे चोळीत चोळीत आंत गेला आणि डॉक्टरला म्हणाला, "बामनरावांकडून बोलावणे आले आहे. " इतका वेळ नखावर नखें वाजवीत बसलेले डॉक्टर घाईनें उठले आणि डोक्यावर चिनई टोपी ठेऊन तसेच वामनरावांच्या बंगल्यावर जाऊन हजर झाले. यावेळी बंगल्यांत कोणीहि नसून कमळाबाई पलंगावर पडून मोठ्याने उं: उं: असे कण्हत होत्या. डॉक्टरला पाहतांच कमळा- बाई मोठ्याने उसासा टाकून कष्टानें म्हणाल्या, डॉक्टर, मी या दुखण्यांतून वांचेनसें दिसत नाहीं. हात पाय फारच उणकतात आणि छातींत फारच दुखत आहे. श्वास देखील घेतां येत नाही. उं: उं: प्राण अगदी कासा- वीस होतो. " 66 तून कमळाबाईचे हे शब्द ऐकून डॉक्टर त्यांना धैर्य देऊन म्हणाले, “ भिऊं नका. तसे घाबरण्यासारखे नाहीं." असे म्हणून त्यांनी रखराच्या नळ्या काढल्या आणि घाईनें त्याची दोन्हीं टोंके त्यांनी कमळा- बाईच्याच कानाला लावली; परंतु तितक्यांत ती चूक त्यांच्या लक्षांत येऊन त्यांनी नळ्यांची टोंके स्वतःच्या कानाला लावून दुसरे टोंक कमळा- बाईच्या छातीवर ते फिरवूं लागले. याप्रमाणे थोडा वेळ परीक्षण केल्यावर त्यांनी कागदावर कांही औषधांची नांवें लिहिली आणि तो कागद मोल- करणीजवळ देऊन तिला ती औषधें आणण्यास सांगितले. मोलकरीण गेल्यावर कमळाबाईचा हात आपल्या हातांत घेऊन (कदाचित् नाडी पाहण्यासाठी) डॉक्तर म्हणाले, " आपली ती नेहमींचीच व्याधी दिसते. कांहीं विशेष आहे, असें नाहीं. गेल्या एक दोन दिवसांत पोट फार दुखत होतें कीं काय ? " असे म्हणून डॉत्तर थोडे हंसले. कमळाबाईच्या चेहऱ्यावरहि हास्याची लकेर चमकली. कमळाबाई म्हणाल्या, पोटदुखी कसली नी व्याधी कसली ! या घरांतल्या भानगडीनेंच मला अगदी जीव नकोसा झाला आहे. त्यांत परवांपासून पुन्हां छाती दुखा- वयाला लागून काल थोडा तापहि आला होता, " "अहो, 66 डॉत्तर हंसून म्हणाले, आपणास व्यवस्थेनें वागण्यास मी अनेक वेळां सांगितले; पण तुम्ही त्याप्रमाणे वागत नाहीं, हें कांहीं चांगलें नाहीं.
पान:सुखाचा शोध.pdf/१२४
Appearance