प्रकरण नववें. १२३ तरी चालला असून त्यावर डॉक्टरसाहेबांचा निर्वाह कसा तरी चाललेला आहे. डॉक्टरच्या या एकंदर गत आयुष्याचा विचार केला म्हणजे त्यांचें आणि नशिचाचें बरेंच वांकडे असावें, असें सहज अनुमान निघतें. तसेच "इतकी वर्षे काळाशीं झगडण्यांत गेली असल्याने ते थोडेसे उतारवयाचे झाले आहेत. हे त्यांना विचारण्याचें कारण पडूं नये म्हणून त्यांनीं मस्तका- वरच मुख्य चिन्ह ठेवले आहे. त्यांच्या मस्तकावरील पिंजलेला पांढरा स्वच्छ कापूस पाहिला म्हणजे पुढे घालवावयाच्या आयुष्यापेक्षा त्यांनी अधिक आयुष्य घालविले आहे, असेंच स्पष्ट दिसून येतें. अशा स्थितीतहि निराशेची चिन्हें त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहींत. एक दिवस तरी ऐहिक सुख आपल्या पायाशीं लोटांगण घालीत येणार, अशी त्यांची समजूत आहे व ती वेळ आतां कांहीं दूर नाहीं, असेंहि त्यांना बाटूं लागले आहे. त्या दिवशीं तीन चार वाजण्याच्या सुमारास डॉ. नीलकंठराव आपल्या दवाखान्यांत एका खुर्चीवर बसून रोग्यांची काळजी करीत होते. रोग्यांची काळजी याचा अर्थ रोगी कसे बरे होतील, असा कोणी कृपा करून करूं नये. दवाखान्यांत रोगी कसे येतील, याची ते काळजी करीत होते. गेल्या पंधरा वर्षीत कंपाउंडरचें त्यांना कारणच न पडल्यामुळे ते स्वतःच सर्व कामकाज करीत होते. क्वचित् चुकून एकादा रोगी यांच्या हाती लागला, तर त्याला ते आपल्या हातांतून लवकर सोडीत नसत. डॉक्टरसाहेबांच्या या व्यवहारामुळे कोणी त्यांना काट्याचा नायटा करणारे डॉक्टर असे म्हणत; पण त्यांचे व्यवसायबंधु त्यांना डॉ. लीच म्हणून म्हणत. दवा- खान्याची झाडझूड करण्यासाठी त्यांनी एक छोकरा नौकरीला ठेवला होता. त्याचें नांव बाबू. डॉक्टरसाहेबांची बहुतेक कामें या एकाच मुलाला करावी लागत असल्यामुळे तो विचारा या नौकरीला अगदी कंटाळून गेला होता. दवाखान्याच्या दरवाजाशीं एका मोडक्या खुर्चीवर त्या दिवशीं बाबू बसून झोपेची डुकली घेत असतां तितक्यांत एक मोलकरीणबाई तेथें आली आणि बाबूला हालवून म्हणाली, "बाबू ऊठ. ऊठ. जा, डॉक्टर- साहेबांना लवकर बोलावले आहे म्हणून सांग, "
पान:सुखाचा शोध.pdf/१२३
Appearance