Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण नववें. १२५ तुम्ही दररोज तीन वेळां सूप घेत जा आणि सकाळ संध्याकाळ घरच्या गाडींतून समुद्राकडे फिरावयाला जात जा. याप्रमाणे एक दोन महिने नियमानें वागल्यास तुमच्या प्रकृतींत किती तरी फरक पडेल, " उजव्या कुशीवर वळून व डॉक्तरकडे चांगली दृष्टी पुरवून कमळाबाई थोड्या रागानें ह्मणाल्या, " डॉत्तर, आमच्या घरांतील सगळी हकीकत तुझाला माहीत तर आहेच. गेल्या उन्हाळ्यांत मला चार दिवस महाब- ळेश्वरी पाठवा ह्मणून किती तरी मी गळ घातली; पण तेवढे कांहीं त्यांच्यानें करवलें नाहीं." असे ह्मणून कमळाबाईनी आपल्या डोळ्यांत पाणी आणलें, डॉक्तरचें हृदय यामुळे हललें नाहीं, असे कांहीं नाहीं. सहानुभूति दर्शवून ते ह्मणाले, “वामनरावांनीं कां अमान्य केले ते समजत नाहीं. पाहिल्याने तुमचा शब्द कांहीं ते वांया जाऊं देत नसत. बरें पैशाच्या संबंधानें ह्मणावें तर तशीहि कांहीं काटकसर दिसत नाहीं. उलट केव्हां केव्हां अनावश्यक खर्चहि झालेला दिसतो." “ पैशाची काटकसर कसली, उलट उधळपट्टीच चालली आहे; परंतु माझ्यासंबंधानें मात्र कमी अधिक खर्च होता कामा नये, असा कटाक्ष दिसतो." डॉक्तर सहानुभूतिपूर्वक गंभीर स्वरानें ह्मणाले, "तसे असेल, तर तुह्मीहि यासंबंधानें सावधगिरी बाळगावयास पाहिजे, तसेंच वामनरावांनाहि थोड़ें सुचवून ठेवलेले बरें." “ त्यांचें तर हितानहित ज्ञान सगळें लुप्त झाले आहे. कोणीहि गोड गोड बोलून दोन थापा मारल्या ह्मणजे खुष होतात, परवां एका लफंग्यानें पैसाफंडाचें व्याख्यान देतांच एकरों एक रुपये त्याच्या स्वाधीन केले. आपणासारख्या सुधारकाला यामुळे कमीपणा येईल, वगैरे मीं पुष्कळ सांगितले; पण राष्ट्रहिताची कामें सुधारक आणि दुर्धारक यांसाठी वाट लेली नाहीत, असे सांगून रुपये द्यायचे झाले. " इतक्यांत मोलकरणीने दोन पेले चहा करून आणला आणि तो त्या दोघांच्या हातीं दिला. चहा पीत असतां डॉत्तर ह्मणाले, "असल्या कृत्याला वामनरावांनी एकशे एक रुपये देणें ह्मणजे पैशाची उधळपट्टी करणे होय."