१२२ सुखाचा शोध, मोठें समाधान झाले होतें. बोटीवरील औषधांचा सांठा लवकर लवकर रिकामा होत आहे, हे पाहून डॉक्टरसाहेब औषधें विकतात, असा आग- बोटकंपनीला संशय येऊन कंपनीनें डॉक्तरसाहेबांची बोळवण केली. वास्तविक खरा प्रकार अगदीं निराळा होता. बोटीवरील समुद्राच्या हवेमुळे 'डॉक्तरसाहेबांची प्रकृति बिघडली आणि ती सुधारण्यासाठीं लाल रंगाच्या तरल पदार्थानी भरलेल्या मोठाल्या बाटल्या त्यांना लागूं लागल्या. या बाटल्या बोटीवरील दवाखान्यांत नसल्यामुळे कांहीं औषधांच्या मोबदल्यांत त्या डॉक्तरसाहेबांनी मिळविण्यास आरंभ केला. वस्तुस्थिति अशी असतां आगबोटकंपनीनें डॉक्तरसाहेबांवर चोरीचा व दारूबाजीचा आरोप ठेवला आणि त्यांना रजा दिली. नंतर मुंबईच्या प्रसिद्ध गोकुळदास तेजपाळ दवाखान्यांत डॉक्टरसाहेबांना शंभर रुपयांची नौकरी लागली. दोन वर्षे येथेंहि त्यांची सुरळीत गेलीं; परंतु एके दिवशीं एक परिचारिका आपल्या खोलींत निजलेली असतां डॉक्तरसाहेबांनीहि निद्रारागाच्या भरांत त्याच खोलींत प्रवेश केला. या नव्या रोगानें डॉतर आजारी झाले आहेत, असें पाहून या परिचारिकेनें मोठ्यानें शंख केला. त्याबरोबर आणखी एक दोन डॉक्टर, कंपाउंडर वगैरे धांवून आले आणि त्यांनी डॉक्टरसाहेबांच्या डोळ्यांत अंजन घालून त्यांना दवाखान्याच्या बाहेर घालवून दिले. त्या परिचारिकेच्या अरसिकपणाला नांवें ठेवून डॉक्तरसाहेब पुन्हां विश्रांति घेऊं लागले. ही विश्रांति घेत असतां त्यांच्या पत्नीवर मृत्यूची कुन्हाड पडली आणि त्यामुळे सगळे जग डॉक्तरसाहेबांना ओके ओके दिसं लागलें, तथापि ते निराश झाले नाहींत. ऐहिक सुखासाठी त्यांनी आपली कंबर इतकी कसून बांधली होती कीं, कोणत्याहि संकटानें ते नाउमेद होत नसत. यानंतर डॉक्टरनी मुंबईतील बड्या डॉक्टरची ऐट आणून रोग्यांना फक्त औषधाची यादी लिहून देण्याचें ऑफीस उघडलें; पण मुंबईचे रोगी तरी कसले खमंग; त्यांनी डॉक्टरना जागेचें भाडें मात्र वर्षभर भरावयाला लावलें. एक वर्षभर असा अनुभव आल्यावर डॉ. नीलकंठराव यांनी मृतपत्नीच्या अंगावरील दागिने विकून ते मुंबईस दवा- खाना घालून बसले. आज सुमारे पंधरा वर्षे त्यांचा हा दवाखाना कसा
पान:सुखाचा शोध.pdf/१२२
Appearance