लिहितांना मी विसरणें अगदी अशक्य गोष्ट होय ! त्यांच्या पूज्य नांवाचा उल्लेख या ठिकाणी करणें मला भागच पडलें, म्हणू- नच केला आहे.
'सीताचरित्र' हैं भाषांतर असल्याकारणानें त्यांतील प्रत्येक उदात्त विचाराच्या सुंदरपणाचें श्रेय मूळ पुस्तकाच्या कर्त्यालाच आहे; आणि तें वठविण्यांत त्यांनीं आपली कुशलता किती मार्मिक- पणानें प्रदर्शित केली आहे, हें संपूर्ण चरित्र वाचल्यावर वाचणारांस कळून येईल. आमच्या समाजांतील भगिनी वर्ग व बालिका वर्ग. याला या उपयुक्त पुस्तकाचा परिचय व्हावा, आणि याचे भाषांतर केल्याने त्यांनाच असा याचा अधिक उपयोग होईल, या सद्धे- तूनेंच मीं हैं पुस्तक भाषांतर करावयास घेतलें. हाच एक विचार त्यावेळी माझ्या मनांत सारखा घोळत होता. तेव्हां या पुस्तकाचें चीज करणे किंवा त्यांतील दोपस्थले दाखविणें हें प्रत्येक महाराष्ट्र भगिनीचे व बंधूचें एक पुण्यदायक कर्तव्य आहे. दुसऱ्याच्या पुस्त- काचें भाषांतर करणें हैं स्वतंत्र पुस्तक लिहिण्यापेक्षां गौणच आहे, हें खरें; परंतु रिकामावेळ जाण्याला असली भाषांतरेंच माझ्या उपयोगी पडोत अशी मी देवाची प्रार्थना करते. मूळ हिंदी ग्रंथ- कार महाशय श्रीरामशर्मा यांनी वेळोवेळी जी माहिती दिली, आणि त्यांनी जी सुजनता दाखविली त्याबद्दल, व त्यांच्या सुशिल स्वभावाबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य आहे. ग्रंथ प्रकाशनाची परवानगी त्यांनी कांहींहि मोबदला न घेतां दिली, हे त्यांचे उप- कार माझ्यावरच नुसते नसून, सर्व महाराष्ट्र भगिनींवर आहेत, असे सर्व म्हणावें लागतें. हिंदी आणि मराठी भाषेचें प्रेम वरील प्रमाणेच वृद्धिंगत व्हावे, आणि तिचे सुपरिणाम अखिल भारत वर्षांतील स्त्रीपुरुष समाजावर व्हावेत, मनिषा असणारच ! कृपाळु जगदीश ती
अशी सर्व हिंदवासीयांची पुर्ण करो, हीच प्रार्थना
पान:सीताचरित्र.pdf/९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३