प्रत्येक सुशिक्षित बंधु भगिनी त्या जगच्चालकाजवळ केल्याशिवाय राहणार नाहीं, असे मला वाटतें.
प्रस्तुत ' सीताचरित्र' हें आपल्या इकडील पौराणिक पद्ध- ती सरळ रूपांतर नाहीं. या पुस्तकांत जागजागीं गुणदोषविवे- चन फारच मार्मिक व काळजीपुरःसर केलेले आढळते. ग्रंथ- कर्त्यांची ती मनोहरविचार सरणी पाहून काय हें उदात्त विवेचन केले आहे' असे शब्द आपोआप मुखावाटे बाहेर पडतात. इतका त्यांतील सुंदर विचारांचा परिणाम मनावर होतो. ह्या पुस्तकांतील मूळ प्रस्तावना मुद्दामच येथे दिली आहे. तिच्यांतील ग्रंथ कर्त्याच्या विचारांचा लाभ महाराष्ट्र भगिनीला मिळावा, हाच ती देण्याचा माझा उद्देश आहे. 'सीताचरित्र' लवकर छापून प्रसिद्ध करावयाचे आहे, तेव्हां तें होईल तितके लवकर लिहून द्या, असा माझ्या पाठीमागे तगादा रा. रा. अनंत नारायण भागवत यांनी केल्यामुळे हैं काम माझ्या हातून कसे तरी पार पडले आहे, याचें सर्व श्रेय त्यांनाच आहे. त्यांचा तगादा जर नमता तर मी इतक्या लवकर हें केव्हांच लिहून पुरें केले नसते, अशी माझ्या मनाची खात्री आहे. तेव्हां व्यावहारिक शब्द ' आभारी आहे' हे न लिहितां पुढील आणखी पुस्तकांची भाषांतरें करण्यास ते असेंच प्रोत्साहन देवोत, हीच माझी सदिच्छा कोणाच्याही प्रेरणेनें कां होईना, सफल होऊन महाराष्ट्र भगिनींच्या कामी माझा कांही तरी वेळ खर्च करण्याची तो जगाचा चालक व आमचा सर्वांचा प्रतिपालक ईश्वर मला सद्बुद्धि देवो, हीच माझी त्याच्याजवळ रात्रंदिवस प्रार्थना आहे. ती पूर्ण करणे, त्या प्रभूच्या हातीं आहे. शेवटीं ' राजकु- मारी ' पुस्तकानंतर पुनः महाराष्ट्र भगिनीची भेट घेण्याचा सुप्रसंग साध्वी 'सीतेच्या चरित्रानें ' आणून दिला याबद्दल पुन्हा मूळ हिंदी ग्रंथकाराचे व अलाहाबाद येथील ' इंडियन प्रेसच्या ' चाल-
पान:सीताचरित्र.pdf/१०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४