Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हां त्यांना हे सांगतांना वाईट वाटते, याकरितां त्यांनी दुसरी एखादी गोष्ट सांगावी म्हणजे झाले. जें हें थोडेसें माझ्यासंबंधाने विवेचन करावें लागलें, त्यांत माझा खासगी भाग अगदीच टाळतां येईना म्हणून केले आहे. नाहींतर पुढील संगती चुकली असती. कारण ' सीताचरित्र' या हिंदी पुस्तकाचें भाषांतर करण्याची मला जी स्फूर्ति झाली, तिचे बरेचसें श्रेय माझ्या त्या परमपूज्य पिता- मह अण्णांनाच आहे. हें लिहिण्यास मला खरोखरच फार अभि मान वाटतो. कारण त्यांनी माझ्या लहानपणीं म्हणजे मी सुमारें आठ एक वर्षांची असतांना माझ्याकडून क्रमिक पुस्तकें वाचून न घेतां, शिवलीलामृत, रामविजय, वगैरे भक्तिपर ग्रंथ वाचून वेतले. माझे पहिले क्रमिक पुस्तक म्हणजे शिवलीलामृत हैं होय. त्यानंतर रामविजय, भक्तविजय, कथाकल्पतरु वगैरे भक्तिपर ग्रंथ माझ्याकडून ते वाचून घेत असत, व त्यांतील कठीण अर्थ मला नीट समजावून सांगत असत. त्यामुळे रामायण व महाभारत हे ग्रंथ मला अत्यंत पूज्य वाटतात. त्यांचा कोणी उपहास केला, तर मला अत्यंत राग येऊन दुःख होते, व त्या निंदा करणारांचा मला अगदी तिटकारा वाटतो. तेव्हां प्रस्तुतचें ' सीताचरित्र' हें पुस्तक त्यांनी लहानपणी माझ्या मनावर बिंबविलेल्या परिणामाचें तर अल्पसें फळ नसेलना ? मला तर वाटतें त्यांनीच माझ्या मनाचा कल इकडे वळविला. तेव्हां हें पुस्तक शेवटास गेल्याचे श्रेय खरो- खरच त्या पूज्य आत्म्याला आहे, असें माझें मत आहे. हें पुस्तक माझ्या हातून तयार झालेले पहावयास त्यांचा आत्मा या लोकीं जरी नसला, तरी पण सूक्ष्म रूपाने ते ही माझी अल्पकृती पाहून प्रेमाने मला आशीर्वाद देतील असा त्यांच्यावरील असलेल्या माझ्या अत्यंत प्रेमामुळे मला भरवसा वाटतो. हें चरित्र लिहितांना अनेक वेळां मला त्यांचे स्मरण झालें. तेव्हां तें ही प्रस्तावना