Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सीताचरित्र.
पहिलें कांड.
जन्म आणि स्वयंवर.

 ज्या प्रदेशाला हल्ली तिरहुत म्हणतात, व ज्यांत सांप्रत दरभंगा संस्थानाचा समावेश होतो, त्याला व त्याच्या आजूबाजूच्या प्रदे- शाला प्राचीन काळी मिथिला म्हणत असत. या मिथिला प्रदेशांत पूर्वी मोठे मोठे प्रतापी राजे राज्य करीत होते. मिथिला प्रदेशाच्या प्राचीन राजांचा वंश फार उच्च, प्रतिष्ठित व विख्यात होता. या वंशाचा मूळ पुरुष निमि असून हाच या वंशाचा पहिला राजा होय. यामुळेच या वंशाला निर्मिवंश म्हणतात. त्या महात्म्या निर्माला मिथि आणि मिथला जनक असे पुत्र झाले. त्याच्याच नांवावरूत मिथिलेच्या सर्व राजपुरुषांना ' जनक ' म्हणत.
 ज्या वेळेस अयोध्याधीश महाराज दशरथ आपल्या शुभजन्म- कर्मांनीं समस्त आर्यभूमीला व विशेषतः अयोध्येला कृतार्थ व पवित्र करीत होते, त्याच वेळेस मिथिलाधिपति महाराज जनक आपल्या पवित्र राजसिंहासनावर विराजमान होऊन आपल्या कुलाची मानमर्यादा वाढवीत होते. महाराज जनक अद्वितीय विद्वान्, अद्वितीय ज्ञानी आणि अद्वितीय जितेंद्रिय होते. त्यांची धार्मिकता व सच्चरित्रता समस्त भूमंडलांत पसरली होती. ते त्यांच्या वेळच्या सर्व राजांत मोठे तत्त्वज्ञानी होते, व एवढ्याच