पान:सीताचरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांतील अमोल उपदेश, ग्रहण करून स्त्रिया आपल्या ठिकाणी तिचे सर्व सद्गुण संपादन करूं शकतील अशी आमची खात्री आहे.
 सध्यांच्या काळीं स्त्रीशिक्षणाच्या उपयोगी पडणाऱ्या अशा हिंदी पुस्तकांचा अभाव पाहून हैं ' सीताचरित्र' आम्ही लिहिलें आहे. आम्हांला आशा वाटते की, भारतवर्षीय ललनावर्ग हैं चरित्र वाचून यांतील कांहीं तरी उपदेश ग्रहण करील.
 आम्ही आमचें काम केलें आहे. स्त्री-शिक्षोपयोगी उत्तम पुस्त- कांचा बहुतेक अभाव पाहून आमच्या मनांत हैं पुस्तक लिहिण्याची प्रबल उत्कंठा झाली होती, ती ईश्वराच्या कृपेने आणि इंडियन प्रेसचे मालक व हिंदी पुस्तकांचे परम उत्साही प्रकाशक श्रीमान् बाबू चिंतामणि घोष यांच्या सहाय्याने पूर्ण झाली. आतां हिंदी पाठक आणि पाठिका यांचें हें पुस्तक वाचून यांतील सार ग्रहण करण्याचे कर्तव्य आहे, तें ते करतील.<br.  या पुस्तकाने भारतवर्षीय महिलागणाला थोडासा जरी लाभ झाला, तरी तेवढ्यानेंच आमच्या श्रमाचें सार्थक झाले असें आम्ही समजूं.
मु. इंदूर ता. १९ - २१-१९१९.
 करवीचा बंगला.लेखक.