Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सीताचरित्र.

करितां ऋषिमंडळींनी त्यांना ' राजर्षि' या संबोधनाने अलंकृत केले होते. वास्तविक ते धर्मं व न्याय या दोन्ही गोष्टींतही ज्ञाते होते. अनेक दूरदूरचे लोक, तसेच ब्राह्मण, ऋषि, व मुनि त्यांच्यापाशीं तत्त्वज्ञान शिकण्याकरितां व आपापल्या शंकांचें समाधान करून घेण्याकरितां येत असत. याशिवाय या गोष्टीला आणखी मोठें प्रमाण ते कोणतें पा- हिजे ! एका क्षत्रियराजाजवळ तत्त्वज्ञान शिकण्याकरितां ऋषि-मु नींनीं येणें, यावरूनच राजर्षि जनक हे अद्वितीय तत्त्वज्ञानी व मोठे विद्वान् होते हैं सिद्ध होत आहे. याच कारणावरून ते सदेह अ. सूनही त्यांस लोक ' विदेह' म्हणत असत. सारांश हाच कीं, ते देह- परायण नव्हते. तसेच ते इंद्रियवशभूत नसून कामवासनेच्या जाळ्यां- तही फसले नव्हते. ते पूर्ण तृषारहित होते. परंतु अशा स्थितीतही ते प्रजापालन व राजकार्य हीं उत्तम रीतीने करीत होते. अशा तत्त्वज्ञा- न्याकडून राज्यकारभार उत्तम रीतीने चाललेला पाहून सर्व लोक आपापल्या ठिकाणी चकित होत असत. अनेक देशदेशांतराहून पु- कळ ब्रह्मज्ञानि ऋषि, मुनि वगैरे राजर्षि जनकाच्या सर्भेत येऊन त्यांच्याबरोबर अनेक गूढ विषयांवर चर्चा करीत असत. राजा जन- काची विद्वत्ता व सौजन्य पाहून सर्व लोक आनंदित होत असत.
 ज्या जगमान्य व असामान्य स्त्रीचें चरित्र आह्मी लिहीत आहों, ती नारीकुलभूषण सतीशिरोमणि श्रीसीतादेवी त्या महाराज जनकाची कन्या होय. राजर्षि जनकानें आपल्या या कन्येचे लालन- पालन अशा रीतीनें केलें कीं, ती चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू ला- गली. ज्याप्रमाणे विरल ढगांतून चंद्राची श्वेत व चारु चमक दिसावी, त्याप्रमाणे सीतादेवी जशी जशी थोर होऊं लागली तशी तशी तिच्या कोमल शरिरावर रूपलावण्याची प्रभा चमकूं लागली. या वेळेस सीतादेवीच्या लावण्याकडे पाहून नागरिक जन मनांतल्या- मनांत म्हणत असत की, जनक महाराजांची हीं कन्या साधारण नाहीं.