पान:सिंचननोंदी.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - १२

पाण्यासाठी दाही दिशा....

 हाराष्ट्रात आजपर्यंत चार हजार कोटी रुपये (फक्त 1) खर्चून आपण कालवा सिंचनाचा' दुखणाईत प्रकार जन्माला घातला आहे. सर्वदृष्टीने आजारी असलेले सिंचन फसवे व खर्चिक औषधोपचार करून आपण कसे तरी जगवतो आहोत. बाढवतो आहोत. . महाराष्ट्राच्या अंदाजपत्रकातील साधारणपणे १५ ते २० टक्के तरतूद केवळ सिंचनासाठी आपण गेली अनेक वर्षे करत आहोत. लाडावलेल्या या आजारी परंतु उद्दाम उधळ्या बाळासाठी आता आठव्या पंचवार्षिक योजनेत पुन्हा अंदाजे चार हजार कोटी रुपये मागितले जाणार आहेत.
 अशा वेळी 'का तुमचे सिंचन आजारी आहे ? हे आजारपण दूर करण्यासाठी काय दूरगामी धोरण आहे तुमच्यापाशी ? आजवरच्या अनुभवातून कोणते धडे शिकलात तुम्ही ? काय गुणात्मक बदल करणार आहात नुकत्याच हाती घेतलेल्या किंवा यापुढे घेण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांमध्ये ? हे प्रश्न आज विचारले गेले पाहिजेत. समाधानकारक उत्तरांबद्दल आग्रह धरला गेला पाहिजे. अन्यथा, भ्रमनिरास व पश्चाताप या पलीकडे आपल्या हाती काहीही लागणार नाही.
 उच्चाधिकार समितीसारख्या सिंचनविषयक समित्यांचे आणि विविध आयोगांचे अधिकृत शासकीय अहवाल, गेल्या दहा वर्षांत औरंगाबादच्या 'वाल्मी'ने केलेले मुळा व इतर अनेक सिंचन प्रकल्पांचे वैज्ञानिक/ आंतरशाखीय मूल्यमापन, एस. ए.इ. सी. विभागाने संकलित केलेला बारा लघुपाटबंधाऱ्यांचा निदानात्मकं विश्लेषणाच्या (डायग्नोस्टिक अॅनालिसीस) धर्तीवर केलेला अगदी अलीकडचा अभ्यास या सर्वांतून एकच एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते आणि ती म्हणजे थातुरमातुर उपाय करून सिंचनाची तब्येत सुधारणे नाही..

उपाय कोणते ?

 गरज शॉक देण्याची आहे. वेळ शस्त्रक्रियेची आहे. सिंचन व्यवस्थापनातील मक्तेदारी कठोरपणे मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सिंचनात कार्यक्षमता, सामाजिक न्याय, वैज्ञानिकता व आधुनिकता आणण्यासाठी एक सुरुवात म्हणून खालील उपाय योजणे अत्यंत निकडीचे झाले आहे.
 १) महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे खात्याच्या दोन्ही सचिवपदी आय. ए. एस. अधिकाऱ्यांची नेमणूक विनाविलंब करावी. पंचवीस तीस वर्षे खात्यातच असलेले अभियंते सचिवपदी गेल्यावर मूलभूतरीत्या वेगळा विचार आणि त्याप्रमाणे आचार करूच शकत नाही. उघ्ड व सर्वज्ञात कारणांमुळे! त्या पदावर पाटी कोरी असलेल्या व्यक्ती आल्या तर कदाचित नवीन काही करण्याची इच्छा व धाडस त्या दाखवू शकतील.
 २) विश्वेश्वरय्यांचा वारसा सांगणाऱ्या पाटबंधारे खात्याची अधोगती होत असताना कोणत्याही प्रकारचा परिणामकारक अभियांत्रिकी हस्तक्षेप वेळीच न करणाऱ्या आणि कळून सवरून खात्यातल्या दुर्योधन- दुःशासनांपुढे हताश, विवश, हतबल अवस्थेत काळ कंठणान्या आमच्या सर्व भीष्म, द्रोण, कृपाचार्य मुख्य अभियंत्यांना शासनाने त्वरित सेवामुक्त करावे.
 ३) प्रत्यक्ष सिंचन व्यवस्थापनामध्ये तीन वर्षांहून अधिक काळ असणारे प्रशासक, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, व उपअभियंते यांची त्या त्या

५३