पान:सिंचननोंदी.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकारच्या गेट ऑपरेशनमध्ये आहे. ही गेट ऑपरेशनस करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक झाला. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज द परिस्थितीची मागणी म्हणून आले.
 कॅलिफ़ोनिया कालव्याच्या धर्तीवर नर्मदा कालव्यावर स्वयंचलीतीकरण करण्याचा प्रयत्न भारतात होत आहे. म्हणून आपण या तंत्राचा तपशील अभ्यासणे आवश्यक आहे.

प्रॉव्हेन्स दे कॅनॉल

 दक्षिण फ्रान्स. मुख्य नदी होने. तिची उपनदी ड्युरान्स आणि ड्युरान्स नदीची उपनदी व्हरडॉन.. या व्हरडॉन नदीचे पाणी नेले आहे टाकलॉन व मार्सेलिस शहरांकडे आणि बेटे तलावाकाठच्या औद्योगिक पट्ट्यांकडे. कालव्याचे नाव 'प्रॉव्हेन्स दे कॅनॉल'.
 प्रॉव्डेन्स दे कॅनॉल हा गतिमान नियमनाचा फ्रेंच अवतार. सध्या तरी कालवा चालविण्याचे सर्वोत्तम तंत्र. विसाव्या शतकातील सिंचन अभियांत्रिकीची एक महत्त्वपूर्ण उपलब्धी. या कालव्याची चर्चा गेली दोन दशके सिंचनाच्या क्षेत्रात सर्व जगमर चालू आहे. (नेहमीप्रमाणे आपण अर्थातच अपवाद) नजीकच्या भविष्यात प्रॉव्हेन्स दे कॅनॉलचे अनुकरण अनेक देशांत होणार आहे. गुजरातेत माही प्रकल्पास आणि कर्नाटकात तुंगभद्रा कालव्यावर प्रॉव्हेन्स वे कॅनॉलची भारतीय आवृत्ती साकारण्याची शक्यता निर्माणदेखील झाली आहे.
 -अंदाजे १४०० क्युसेकचा हा कालवा. मुख्य कालव्याची लांबी २६० कि.मी. मुख्य कालव्यापासून खाली पाणीवाटपासाठी ३००० कि.मी. लांबीचे भूमिगत पाईपलाईन्सचे जाळे. या पाईपलाईन्सच्या जाळ्यावर अनेक ठिकाणी छोटे छोटे साठवण तलाव. एकंदर पाणी मागणीपैकी ६७ टक्के मागणी बिगरशेती गरजांसाठी तर केवळ ३३ टक्के पाणी मागणी शेतीसाठी. (आपल्या येथेही पाणी भागणीचे स्वरूप झपाट्याने बदलत चाललेय. बिगरशेती गरजांसाठी पाण्याची मागणी वाढत्या शहरीकरणाबरोबर अपरिहार्यपणे वाढणार आहे. कमी पाण्यात जास्त कार्यक्षम सिंचन करावे लागणार आहे.)

४८