पान:सिंचननोंदी.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कॅलिफोर्निया अक्वेडक्ट ! भरपूर पाणी उपलब्ध असणाऱ्या भागातले -जादाचे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील ही एक महाकाय अत्याधुनिक कालवा योजना.
 या योजनेतील मुख्य कालव्यावरच फक्त पूर्ण स्वयंचलीतीकरण केलेले असून त्यावर एकंदर २०० लहान- मोठी विमोचके आहेत. किमान १० क्युसेक तर जास्तीत जास्त १२०० क्युसेक पाणी ही विमोचके मुख्य कालव्यातून घेतात. ही सर्व २०० विमोचके एकंदर फक्त ३१ संघटनांच्या ताब्यात आहेत. मुख्य कालवा चालवताना फक्त त्या ३१ संघटनांशीच व्यवहार केला जातो. वैयक्तिक शेतकऱ्याशी अथवा अन्य ग्राहकांशी नव्हे. कालव्यावरील एकंदर पाणी मागणीपैकी ४५ टक्के मागणी शेतीसाठी तर ५५ टक्के मागणी बिगरशेतीसाठी आहे.
 मुख्य कालव्यात सतत पाणी असते. पाणी वाटपासाठी कालवा चालविणारी यंत्रणा कोणतेही बंधनकारक वेळापत्रक अगोदर तयार करत नाही. ज्या संघटनेला पाणी हवे ती संघटना आपल्या सभासदांच्या मागणीप्रमाणे किती पाणी, केव्हा व किती वेळासाठी हवे हा तपशील स्वतः ठरवून तशी मागणी (पूर्वीच केलेल्या कराराच्या मर्यादेत) फोनवरून फक्त २४ तास आधी नोंदवते. कालवा चालविणारी यंत्रणा कालवाक्षमता, इतर संघटनांना चालू असलेले अथवा द्यायचे असलेले पाणी या सर्वांचा विचार करून मग संगणकाच्या आधारे निर्णय घेते: शक्य असेल तर संघटनेची मागणी जशीच्या तशी त्वरित मान्य होते. अथवा, काही अडचण असल्यास संघटनेच्या मागणीत किमान बदल करून तिला किती, केव्हा व किती वेळ पाणी मिळेल हे लगेचच सांगितले जातो. साधारणतः मागणी आणि पुरवठा यात किमान २४ तास व जास्तीत जास्त ३६ तासांचा अवधी जातो. (या पद्धतीस मॉडिफाईड ऑन डिमांड असे म्हणतात.) कबूल केलेल्या वेळी कबूल केल्याप्रमाणेच पाणी हमखास मिळते. पाणी मांगणीस ऐन वेळी १० टक्क्यांपर्यंत बदल करावयाचे स्वातंत्र्यही संघटनेस असते. संघटनेला पाणी मोजून दिले जाते. आपापल्या क्षेत्रात पाणी कसे वापरायचे हे संघटना ठरवते. मागणी केल्यापासून जास्तीत जास्त ४८ तासांत वैयक्तिक शेतकऱ्याला अथवा अन्य ग्राहकाला पाणी मिळते.
 कॅलिफोर्निया कालव्यावर वापरलेले नवीन तंत्र (कंट्रोल्ड व्हॉल्युम तंत्र) आकृतीमध्ये दाखवले आहे. कल्पना करा कालवा पाण्याने पूर्ण भरलेला आहे. परंतु आडवे नियामक बंद आहेत. त्यामुळे पाणी वाहत नाहीये. दोन दोन आडव्या नियामकांच्या मध्ये कालव्यातच छोटे छोटे तलाव निर्माण झाले आहेत. पाण्याची मागणी येते. कालवा चालू करून पाणी मागणी पूर्ण करण्यासाठी कंट्रोल रूममधून संगणकाच्या आधारे कालव्यावरील सर्व आडवे नियामक एकाच वेळी जरूर तेवढे उचलले जातात. त्यामुळे कालव्यातील प्रत्येक छोट्या सलावातील पाणी त्याच्या खालच्या तलावात पडते आणि कालवा लगेचच सुरू होतो. है सर्व अक्षरशः काही मिनिटांत होते. कालवा चालविण्यात गतिमानता येते. मागणी बदलली तर पुन्हा हवे तेव्हा सर्व आडवे नियामक जरूर तेवढे खाली-वर होतात. कालवा बंद करायचा असेल तर सर्व आडवे नियामक एकाच वेळी बंद होतात आणि काही मिनिटांतच कालवा थांबलो.
 सर्व आडव्या नियामकांवरील सर्व बारे एकाच वेळी एकाच वेगाने सारख्यां प्रमाणात खाली अथवा वर करण्याच्या पद्धतीला सांयमलटेनियस गेट ऑपरेशन म्हणतात.
 कालव्यातील प्रवाहावर अजून जास्त अचूक नियंत्रण हवे अ ल्यास सर्व आडव्या नियामकांवरील सर्व बारे एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या वेगाने, वेगवेगळ्या प्रमाणात खाली अथवा कर करता येतात. या पद्धतीला टाईम्ड गेट ऑपरेशन असे म्हणतात.
 कॅलिफोर्निया कालव्याची यशस्वितता लेव्हल टॉप पद्धतीचा कालवा आणि वरील

४७