पान:सिंचननोंदी.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंघननोंदी - १०

कालवा चालविण्यांची तंत्रे :
गतिमान नियमन

 कालवा चालविण्याचे वरून नियंत्रण (अपस्ट्रिम कंट्रोल), खालून नियंत्रण · (खाऊनस्ट्रिम कंट्रोल) व संयुक्त नियंत्रण (कॉम्बिनेशन कंट्रोल) हे प्रकार खरे तर "स्थानिक स्वयंचलितीकरणाचे (लोकल अटोमेशन) विविध प्रकार आहेत. स्थानिक स्वयंचलितीकरण म्हणजे प्रत्येक दार, प्रत्येक आडवा नियामक स्वतंत्रपणे स्थानिक पातळीवर स्वयंचलीत करणे.. त्यांचा एकमेकांशी संबंध नसणें. अर्थातच, या प्रकारची तंत्रे मैन्युअल कंट्रोलपेक्षा जास्त कार्यक्षम असली तरी त्यांना त्यांच्या स्थानिक स्वयंचलितीकरणामुळे मर्यादा पडतात.
 या मर्यादा संगणकाद्वारे मध्यवर्ती स्वयंचलीतीकरण करून दूर करता येतात. सर्व आइये नियामक एकमेकांशी इलेक्ट्रिक किंवा इतर माध्यमातून जोडले आणि दूर अंतरावरून एकाच ठिकाणांहून त्यांच्या हालचालींचे नियमन केले तर त्याला मध्यवर्ती स्वयंचलितीकरण असे म्हणतात. ते अर्थातच अतिशय कार्यक्षम असते. कारण एक तर संपूर्ण कालव्यावरील ठिकठिकाणची पाण्याची पातळी व प्रवाह सतत कळत राहतो. व त्याआधारे संगणकाद्वारे त्वरित निर्णय होऊन आडव्या नियमकांची लगेचच योग्य ती हालचाल होते.
 कालव्यातील प्रवाहाला स्वतःची एक गतिमानता असते. त्या गतिमानतेला संपूर्ण न्याय मिळेल अशा रीतीने कालव्यांचे नियमन करणे म्हणजे गतिमान नियमन - डायनेमिक रेग्युलेशन.

 आज जगात गतिमान नियमनाची दोन यशस्वी उदाहरणे आहेत. एक, अमेरिकेतला कॅलिफोर्निया अॅक्वेडक्टं आणि दुसरे, फ्रान्समधला प्रॉव्हेन्स दे कॅनॉल.

कैलिफोर्निया अॅक्वेडक्ट

 ६३० कि.मी. लांबीचा लेव्हल टॉप पद्धतीचा कालवा, १९ कि.मी. चा टनेल. ६६ किं.मी. ची प्रेशन पाईपलाईन. कालव्यावर विविध टप्प्यांत पाणी उचलण्यासाठी ८ पंपिंग प्लॅन्टस् (७३ युनिटस्). विद्युत निर्मितीसाठी १ जनरेटिंग प्लॅन्ट (२ युनिटस् ). २ पंपिंग जनरेटिंग प्लॅन्टस (१५ युनिटस्) प्रवाह नियंत्रणासाठी एकंदर ५७ आडवे नियामक. प्रत्येक आडव्यां नियामकावर एकापेक्षा जास्त रेडियल पद्धतीची स्वयंचलित दारे (एकंदर १८६ दारे) प्रत्येक स्वयंचलित दाराला स्वतंत्र व्हेरिएबल स्पीड मोटार. दाराच्या दोन्ही अंगांना पाण्याची पातळी सतत अचूक व दूर अंतरावरून मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सेन्सर, प्रवाहमापनासाठी ठिकठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणे. टेलिमेट्री (दूर अंतरावरून मोजमाप करण्याचे तंत्र) पद्धतीचा सुयोग्य उपयोग. पाण्याची पातळी, प्रवाहमापन व आडवे नियामक किती से.मी. ने उघडलेले आहेत या माहितीच्या आधारे त्वरित निर्णय घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संगणकाचा वापर. घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आडव्या नियामकांची त्वरित स्वयंचलीत हालचाल होण्यासाठी रिमोट कंट्रोल व्यवस्था. इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टिमस्, संगणकीकरण, प्रगत जलगतिशास्त्र यांच्या साहाय्याने प्रत्यक्षात आलेले खन्याखुऱ्या अर्थाने २१ व्या शतकाचे एक अभियांत्रिकी महाकाव्य म्हणजे

४६