पान:सिंचननोंदी.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्ही 'तुमचं अज्याबात ऐकणार नाही
कारण, एक तर तुमची गावंढळ भाषा..
म्हणे, तोट्या करून द्या'
आणि दुसरं असं की, आम्ही तुमचं का
ऐकावं ?
तुम्ही इंजिनियर नाही
शेतकन्याचा आसूड मान्यताप्राप्त
आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत
प्रसिद्ध झालेला नाही.
कोणत्याही परदेशी तज्ज्ञानं तुमच्या
नावाची शिफारस
आमच्याकडे केलेली नाही.
तुम्ही जागतिक बँकेचे कन्सल्टंट नाही.
यू. एस. एड. मध्ये तुम्हाला कोणी
ओळखत नाही.
तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले,
माफ करा.
आम्ही तुम्हाला ओळखत नाही
आमच्यासाठी तुम्ही झालाच नाहीत'
पण शेवटी ज्योतिबा,
खाजगीत
तुमचे आभार मात्र मानले पाहिजेत
बरं झालं! तुम्ही पूर्वीच होऊन गेलात !!
आता हयात असता तर
नक्कीच शेतकयांचा आसूड लिहिला असतात
पेपरवाल्यांनीही तो छापला असता
त्यांना काय ?काही पण छापतात
आणि मग
लोकांनी भंडावून सोडलं असतं.
पाणीवाटपाची 'फुले पद्धत लागू करा
म्हणून!
पण आता काही प्रश्न नाही
पुन्हा ज्योतिबा फुले' होणे नाही
तेव्हा आभार. ज्योतिबा, आभार.
मनःपूर्वक आभार.

(३ डिसेंबर १९८९)

४१.