पान:सिंचननोंदी.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"शेतकन्यांचा आसूड लिहायच्या अगोदर
ज़रा तरी कल्पना द्यायची आम्हाला
अहो.
आय. बी. मध्ये पार्टी केली असती
कारमधून कमांडमध्ये हिंडलो असतो
रंगीबेरंगी फायलीतल्या आकडेवारीत
सचैल स्नान केले असते
पढवून ठेवलेल्या कास्तकारांची मुलाखत
घेतली असती
सिचनाबद्दलचे 'तुमचे गैरसमज दूर
झाले असले
पण तुम्ही म्हणजे भलतेच अव्यवहारी
निघालात.
सिंचन व्यवस्थापनासाठी एकदम
मिसफिट,
पुरते डेंजरस
आणि ज्योतिबा,
शेवटी तर तुम्ही कहरच केलात
'शेताच्या पाण्यांच्या मानाप्रमाणे प्रत्येकास
एकेक तोटी करून द्यावी'
ही कल्पना अहो. अगदी अलीकडच्या
काळातली
प्रथम अमेरिकेत हे झालं
आणि नंतर चक्क
१९८० पासून (आयपीकेएफवाल्या)
श्रीलंकेत प्रयोग चालू
"लिमिटेड रेट डिमांड शेड्यूल' हे त्याचं.
भारदस्त नाव
संयुक्त नियंत्रणाचा हा एक प्रकार !
इतिहासात जे १०० वर्षांनी घडायचं होतं
ते अगोदरच सांगून तुम्ही
द्रष्टेपण दाखवलं असा तुमचा समज
असेल तर
तो आम्हाला मान्य नाही. ज्योतिबा,
इतिहासाच्या क्रमात ढवळाढवळ करण्याचा
अधिकार तुम्हाला मुळात दिला कोणी ?
आता चुकून तुम्ही म्हणता तेच बरोबर
असेल
'युरोपातील सावकारांनी सांगितलं म्हणून
आम्हाला ते भविष्यात करावंही लागेल
पण

४०