पान:सिंचननोंदी.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुभव नाही
(अर्थात, तीही आमचीच धूर्त योजना!)
वाटेल ते बोलत असतात
आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला
तशातला प्रकार
अशा पुस्तकी किड्यांना
आम्ही बघा अनुल्लेखाने भारतो.
त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो.
पण तुम्हाला म्हणून सांगतो ज्योतिबा,
अंदरकी बात ऐसी है
बडे शेतकरी आम्हालाच गुंडाळून ठेवतात
पोस्टिंगसाठी बदलीसाठी
आम्हीच त्यांची आर्जवे करतो.
राजे, नाकास नळ आमच्या येतात !
आणि छोटे शेतकरी ?
ते समजूतदार असतात.
सहनशील असतात.
'आपल्या पायरीने राहतात.
पाणी बहुदा मिळणारच नाही
किंवा मिळेल तेव्हा मिळेल तसं घ्यायचं
हे त्यांनी मान्यच केलेलं असतं
मग आता सांगा ज्योतिबा,
प्रश्न येतोच कोठे शेतकऱ्यांनी आर्जवे
करायचा ?
आणि
आमची नवीन अफलातून आयडिया
तुम्हाला कोठे माहीत आहे ?
आता आम्ही काय करतो
जेथे पाऊस भरवशाचा व भरपूर आहे
खोल काळ्या जमिनी आहेत.
तेथेच बघा कालवे काढतो
आणि काय सांगू ज्योतिबा
'शेतकऱ्यांचा बेजबाबदारपणा
वात पाणीच घेत नाही हो !
म्हणजे दारात गंगा आणून द्यायची
आणि वर पुन्हा आम्हीच आर्जवे करायची
'पाणी घ्या हो पाणी
काही राष्ट्रवाद वगैरे राहिलाच नाही बघा
ज्योतिबा !
पण ज्योतिबा,
तुमचं नाही म्हटलं तरी चुकलंच