पान:सिंचननोंदी.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'धरणातील पाण्याची मोजदाद करून
जेवढ्या जमिनीस पुरेल
तितक्याच जमिनीच्या मालकांस पाण्याचे
फर्मे द्यावेत'
असं जेव्हा ज्योतिबा तुम्ही सुचवता
तेव्हा तुम्ही तुमचं अज्ञान दाखवता.
तुम्हाला पी.आय.पी. नावाचं प्रकरण
कळलं नाही हेच खरं.
ज्योतिबा,
दुसरं तिसरं काही नाही
तुम्हाला
पी.आय. पी. च्या प्रशिक्षण वर्गालाच
पाठवलं पाहिजे.
ज्योतिबा.....
एक वेळ उद्धटपणा समजू शकतो.
पण कांगावखोरपणासुद्धा करायचा ?
पाण्यासाठी आर्जव करिता करिता (म्हणे)
शेतकन्यांच्या नाकास नळ येतात ज्योतिबा,
हे मात्र लई झालं
शुद्ध आक्रस्ताळेपणा आहे हा !
तुम्हाला माहीत नाही ज्योतिबा
आम्ही किती प्रयत्न करतो ते!
आता हेच पाहा ना!
पाणीवाटपासाठी,
किती पाणी पंचायती आम्ही दणादण
स्थापन केल्या आहेत !
पण काही खोडसाळ लोक
त्यांना 'कागदी पंचायती' म्हणतात
खऱ्याचे दिवस राहिले नाहीत ज्योतिबा
केलेल्या कामाचं चीज नाही बघा
म्हणजे आम्ही मरमर मरायचं
आणि हे म्हणणार
कोणी सांगितल्या होत्या 'नस्त्या पंचायती' ?
म्हणे "कालवा धड चालवा
पाण्याची हमी द्या
शेतकऱ्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करा
मग सगळं आपोआप होतंय "
तुम्हाला सांगतो ज्योतिबा
या खोडसाळ नतद्रष्टांना
सिंचन व्यवस्थापनाचा अज्याबात.

३८