पान:सिंचननोंदी.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाश्चिमात्यांच्या उदारतेबद्दल
आभार मानायच्या ऐवजी
तुम्ही त्यांचा उद्धार करता ?
'युरोपातील सावकारास महामर व्याज
-देण्याचा'
बाऊ करून तुम्ही कृतघ्नपणा करता
असं नाही वाटत तुम्हाला ?
ज्योतिबा,
तुमची चूक आता आम्ही सुधारली आहे !
प्रत्येक प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या
अगोदर
पश्चिमेकडे तोंड करून आम्ही गुडघे
टेकतो
'आकाशातल्या बापा, दे दो साला छप्पर '
फाडके
अशा मंत्रोच्चारात प्रार्थना करतो
'भगीरथ आणि विश्वेश्वरय्या
फड पद्धत आणि पाणी पंचायत
आडगाव आणि बळिराजा धरण
यांच्या नावानं आंघोळ करून
चुल्लूभर पानीमें डॉलर्सच्या पॉप
टाईममध्ये
फार्मर्स पार्टिसिपेशन यूनो. !'
असं तारस्वरात किंचाळत आधुनिकतेवर
लाईन मारतो.
ज्योतिबा,
इसको बोलते हिंदुस्थानकी प्रगती !

आणि हो,
'शेतात वेळच्या वेळी पाणी देण्याचं '
हे काय खूळ काढलं होतंत तुम्ही ?
अरे, महात्मा झालात म्हणून काय
वाटेल ती अपेक्षा करायची ?
आम्ही ठरवू ते शेत
आणि
आम्ही ठरवू ती वेळ
असंच आम्ही पाणी देणार
मग भले कोणी काहीही म्हणोत.
शेवटी आम्हाला काही अस्मिता आहे की
नाही !