पान:सिंचननोंदी.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ८

ज्योतिबा फुल्यांच्या सिंचन नोंदी:
सन १८८३

 हात्मा ज्योतिबा फुले,
माफ करा !
पण तुम्ही खरंच होऊन गेलात का हो ?
नाही म्हणजे काय आहे
आम्ही काही तुम्हाला पाहिलं नाही
वाचलं आहे थोडं फार
ऐकलंसुद्धा बरंच आहे
ऑफिसात फोटो आहे
पण खरं सांगतो
खरं काहीच वाटत नाही.
तुम्ही म्हणे १८८३ साली
शेतकऱ्यांचा आसूड फटकारला
बळिराजाचं गान्हाणं मांडलं
आणि चक्क
सिंचनाबद्दलसुद्धा लिहिलंत
महात्मा ज्योतिबा फुले,
काय हा उद्धटपणा !
अहो,
सिंचन संस्थानाबद्दल
आळी मिळी गुपचिळी
धोरण
स्वीकारण्याची आजदेखील प्रथा असताना
तुम्ही सपशेल १०६ वर्षांपूर्वी सिंचनाबद्दल
"घर की हाण' पद्धतीनं लिहिलंत?
'थ्रुप्रॉपर चॅनेल' नाही, आपला
आज्ञाधारक नाही
काय म्हणावं तरी काय तुम्हाला ?
तुम्हाला राव मेमो दिला पाहिजे
खरं तर स्पष्टीकरणच मागितलं पाहिजे
तुम्ही वापरलेली भाषा वगैरे जाऊ दे
पण तुमचे मुद्दे ?
ज्योतिबा, त्याबद्दल तर तुम्हाला
सिंचन इतिहास कदापि क्षमा करणार
नाही !

३६