पान:सिंचननोंदी.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जलव्यवस्थापनावर अवश्य असणारी आस्थापना, संयंत्रे, दुरुस्तीकरिता लागणारे सामान व त्याकरिता लागणारी आर्थिक तरतूद कमी पडते असे दिसते.
 आर्थिक तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात कमी रकमेचा धनादेश देणे, अपुरे अर्धशिक्षित कर्मचारी वगैरे कोणत्याही कारणाने जरी व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीमध्ये त्रुटी राहिल्या तरी कालव्यांची क्षमता कमी झाल्याने जेवढे पाणी त्या प्रमाणात व योग्य वेळी कालव्यांच्या जाळ्यांमधून योग्य त्या ठिकाणी सारख्या प्रमाणात जावयास हवे ते न पुरविले गेल्याने उत्पादन कमी होते व त्यामुळे पाणीपट्टी वसुली व इतर महसूल कभी झाल्याने पुढील वर्षी आर्थिक तरतूदही कमी होत राहते. अशा दुष्टचक्रामधून बाहेर पडणे अशक्य होत जाते....
 'सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती व त्याकरिता आर्थिक तरतूद' श्री. श्री. ना. लेले, निवृत्त मुख्य अभियंता, केंद्रीय जल आयोग,पुणे. महाराष्ट्र सिंचन विकास, जुलै- ८९

तीन.

 ....शेतचाऱ्या शेतकन्यांनी त्यांच्या खर्चात बांधाव्यात व देखभाल करावी अशी १९८० पर्यंत व्यवस्था होती परंतु प्रत्यक्षात शेतकन्याला बन्याच अडचणी येतात (पैशाच्या तसेच अंमलबजावणीत) असे दिसून आल्यामुळे हा मोठा अडसर दूर करण्यासाठी शासनाने हे काम प्रकल्प खर्चाने करण्याचे १९८० मध्ये ठरविले. तरीही ते जेवढ्या बारकाईने काळजीपूर्वक व आत्सीयतेने व्हावयास हवे तसे न झाल्याने त्यात काही चुका होत राहिल्यामुळे लाभक्षेत्रातील बरेच क्षेत्र पाणी मिळण्यापासून वंचित राहिले. शेतापर्यंत पाणीच पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्याने सिंचन करण्याचा विचार करणेच शक्य नव्हते....
 ...बारकाईची पाहणी व पाणीवाटप व्यवस्थेची शास्त्रशुद्ध आखणी ही किचकट कामे असल्याने दुर्लक्षिली जातात. ही बारकाली कामे विखुरलेली व रस्त्यांपासून दूरच्या आंतील भोगात असल्याने त्यांच्या बांधकामांवर कटाक्षाने देखरेख व तपासणी होत नाही त्यामुळे चान्या वाहून जाणे अगर बांधकामे पडणे व वेळेवर दुरुस्त न होणे यामुळे ते भाग सिंचनाच्या फायद्यापासून कायमचेच वंचित होतात...
 ...लाभक्षेत्राच्या दर हेक्टर सुमारे रु. २५००० ते ४०००० खर्च करून बांधलेल्या मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांवर प्रायोजित क्षेत्रांऐवजी फक्त ४० ते ५० टक्के क्षेत्रच भिजले जाते. आतापर्यंत सुमारे रु. २५०० कोटी खर्च करून २३ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून प्रत्यक्ष वापर १० लाख हेक्टर क्षेत्रावरच होतो. तो बाढविण्यासाठी पाणीवाटप व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे जरूर आहे. चान्यांची आखणी शास्त्रशुद्ध पद्धतीने बारकाईने पाहणी करून व निर्दोष बांधणी करून होणे आवश्यक आहे..... शेतापर्यंत विश्वसनीयरीत्या पाणी पोहोचू शकले तर बी बियाणे खते व कीटकनाशके यावरील खर्च वाढविण्यास शेतकरी धजावेल...
 'पाटबंधारे प्रकल्पावरील पाणी वापरातील समस्य', श्री. म. द. देशमुख, निवृत्त लाभक्षेत्र विकास आयुक्त व सचिव, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र सिंचन, विकास जुलै -१९८९

२३.