पान:सिंचननोंदी.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सिंचन यशस्वी व्हायचे असेल तर जागरूक लोकसहभाग हवा असे अगदी शासकीय अधिकारीसुद्धा म्हणतात. ते बरोबरच आहे.
 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व सिंचन प्रकल्पात पी.आय. पी. करण्याचे काम सुरू होते. आपापल्या सिंचनप्रकल्पातील पी.आय.पी.त लोकांनी लक्ष घालायला का सुरुवात करू नये ? जागरूक शेतकरी, अभ्यासू राजकीय व सामाजिक नेते, स्वयंसेवी संघटना, स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक वगैरे सर्वांनी आपल्या सिंचन प्रकल्पाची पी.आय. पी. संदर्भातील अधिकृत माहिती गोळा करायला सुरुवात केली तर ? पहिल्या वर्षी निदान माहिती तरी गोळा होईल. चर्चा होईल. अभ्यास होईल. तज्ज्ञांचा सल्ला घेता येईल. पुढील वर्षी कदाचित अधिकृत शासकीय पी.आय.पी.ला, ते चांगला पर्यायसुद्धा सुचवू शकतील. हे होऊ शकते. आपण हे जाणीवपूर्वक करायला हवे.

(१० सप्टेंबर १९८९)

१४