पान:सिंचननोंदी.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरणात उपलब्ध आहे असे म्हणण्यात अर्थ नसतो. कारण त्या 'क्ष' पैकी काही भाग हा पाण्याचा नसून प्रत्यक्षात गाळाचा / मातीचा असतो. थोडक्यात, पाण्याच्या एकंदर उपलब्धतेचा अंदाजच चुकला तर पुढचे अंदाजपत्रक चुकणारच. किती लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सुधारित टैंक चार्टस् आज वापरात आहेत ?


प्रारंभीक सिंचन अहवाल (पी.आय.पी.)
धरणातील पाण्याची उपलब्धता

विविध उपयोगांसाठी पाण्याची मागणी


१) धरणातील पाण्याची एकंदर उपलब्धता

१) बिगरशेती गरजांसाठी (पिण्यासाठी. औद्योगीकरणासाठी पाण्याची मागणी)

२) बाष्पीभवन, गळती, झिरपा इ. मुळे धरणामध्ये होणारा पाण्याचा व्यय.

२) पीकसमूह (ब्लॉक) करारातील पीक क्षेत्रासाठी राखून ठेवण्याचे पाणी

३) झिरपा व ऑपरेशनल लॉसेस् यामुळे कालवा व उपकालव्यात होणारा पाण्याचा व्यय

३) हंगामी सिंचनासाठी वितरिकेच्या मुखाशी पाण्याची मागणी.

४) वितरिकेच्या मुखाशी हंगामी सिंचनासाठीच्या पाण्याची उपलब्धता.



 मागील अनेक वर्षांचा धरणातील पाणीपातळीच्या चढ- उताराचा अभ्यास आणि मुख्य कालव्याच्या मुखापाशी कालवा चालू असताना प्रत्यक्षात मोजलेले पाणी या आधारे बाष्पीभवन, गळती, झिरपा इ. कारणांमुळे होणारा पाण्याचा व्यय एकत्रित स्वरूपात मोजता येतो. तो तसा सर्वत्र प्रत्यक्षात मोजला जातो का ? का काही तरी आकडा नुसता गृहित धरला जातो ? ज्या दप्तरातील नोंदीच्या आधारे वरील गणित मांडायचे ते दप्तर व्यवस्थित व विश्वासार्ह ठेवण्यासाठी काय केले जाते ?
 बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा व्यय स्वतंत्रपणे विचारात घेण्याची पद्धतही काही ठिकाणी आहे. बाष्पीभवन प्रत्यक्ष मोजता येते. परंतु ते कोठे मोजले व कशाप्रकारे विचारात घेतले हे महत्त्वाचे आहे. जमिनीवर बाष्पीभवन पात्र ठेवून मोजलेले बाष्पीभवन हे प्रत्यक्ष पाण्याच्या मोठ्या साठ्यातून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा जास्त असते. काही गुणांक वापरून जमिनीवरचे बाष्पीभवनाचे आकड़े कमी करून मग हिशेबात धरायचे असतात. आपण आज असे काही गुणांक अधिकृतरीत्या ठरवले आहेत का ? वापरतो का ?
 कालवा उपकालव्यातून होणारा पाण्याचा व्यय अनेक कारणांमुळे विविध प्रकल्पांत वेगळा असतो. तो निश्चित करण्यासाठी कालवा चालू असताना पाणी योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने मोजावे लागते. त्याचे विश्वासाई दप्तर ठेवावे लागते. शतकाच्या जवळपास कालवा सिंचनाचा इतिहास असणान्या महाराष्ट्रात किती आणि कोणत्या कालव्यांवर आपण शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे व्यय आतापर्यंत निश्चित केले ?
 थोडक्यात, सुधारित टैंक चार्ट नसला आणि विविध मार्गाने होणाच्या पाण्याच्या व्ययाचा शास्त्रीय पद्धतीने काटेकोरपणे अभ्यास केलेला नसला तर पी. आय. पी. मधील पाणी उपलब्धतेचा अंदाज मोठ्या प्रमाणावर चुकू शकतो. कर्मकांड म्हणून तयार झालेला पी.आय.पी.चा हा भाग म्हणूनच पुढील वर्षभराचे सर्व पाणीनियोजन गोत्यात आणतो.

१२