पान:सिंचननोंदी.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २) प्रत्यक्ष सिंचन करताना शाखाधिकान्यांपासून कार्यकारी अभियंत्यापर्यंत विविध पातळ्यांवर वापरलेल्या पाण्याचा व सिंचित पीकक्षेत्राचा प्रत्येक सिंचनपाळीला काटेकोर 'हिशेब ठेवावा. जेथे उणीवा आढळतील तेथे त्वरित स्पष्टीकरण मागवावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करावा.
 ३) रबी हंगामाच्या अखेरीस पाण्याच्या प्रत्यक्ष उपलब्धतेप्रमाणे उन्हाळी सिंचन कार्यक्रमात जरूर ते बदल करावेत.
 ४) पाण्याचा हंगामवार हिशेब कार्यकारी अभियंत्यांनी एकत्रित करून सिंचनपूर्तता अहवाल (Completion Irrigation Report सी. आय. आर. म्हणून प्रसिद्ध ) हंगामानंतर लगेचच तयार करावा. या अहवालात पी.आय.पी. बरोबर तुलना करून दोन्हीतील फरकांबद्दल विश्लेषण करावे. हा सी. आय. आर. अधीक्षक अभियंत्यांनी अभ्यासावा. यातील विसंगती व उणीवांबद्दल स्पष्टीकरण मागवावे. योग्य ते शेरे व सुधारणांसाठीच्या सूचनांसकट तो सी. आय. आर. पुढील पी.आय. पी. तयार व्हायच्या आत मंजूर करावा. 'मुख्य अभियंत्यांनी ही सर्व प्रक्रिया होते आहे की नाही हे पाहावे व आपल्या भेटीत त्याबद्दल आपली मते लेखी नोंदवावीत.
 ५) कार्यकारी अभियंत्यांनी पुढील वर्षी पी.आय. पी. तयार करताना व प्रत्यक्ष सिंचन करताना अधीक्षक व मुख्य अभियंत्यांच्या सूचना लक्षात घेऊन सुधारणा करावी.
 व्यवस्थापनाची ही पंचसूत्री पद्धत सिंचन व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व ते उत्तरोत्तर कार्यक्षम करण्यासाठी आवश्यकच आहे. सर्व संबंधिताना हे मान्य आहे. पद्धतीबद्दल दुमतही अजीबात नाहीये. प्रत्यक्षातल्या अंमलबजावणीबद्दल आणि तपशिलाच्या कालबाह्यतेबद्दल, वैज्ञानिकतेबद्दल, न होणाऱ्या अपेक्षित सुधारणांबद्दल मात्र गंभीर आक्षेप जरूर आहेत.
 पाण्याच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार समिती नेमली होती. त्या समितीने नोव्हेंबर ८१ ला आपला अहवाल शासनाला सादर केला. त्याः अहवालात पृष्ठ क्र. २७ २९ वर पी.आय. पी. व सी. आय. आर. च्या संदर्भात समितीने शासनाने घालून दिलेल्या पद्धती काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधित उच्च पदस्थांवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्या ताशेऱ्यांचा मतीतार्थ एवढाच आहे की, वर वर्णन केलेल्या व्यंवस्थापनाच्या पंचसूत्री पद्धतीत उच्च पदस्थांनी जे करणे अपेक्षित आहे ते त्यांच्याकडून होत नाहीये.
 खाली दिलेले तपशिलाचे काही मुद्दे पाहता उच्चाधिकार समितीच्या निरीक्षणांशी असहमत होणे अवघड वाटते.
 पी.आय. पी. हा प्रकार असतो तरी कसा हे तक्यात दाखवले आहे.

धरणातील पाण्याची उपलब्धता

 पी.आय.पी. करताना सर्वात प्रथम धरणात एकंदर किती पाणी उपलब्ध आहे हे विचारात घेतले जाते. त्यासाठी टैंक चार्टचा वापर केला जातो. दर महिन्याला धरण कसे मरले वा रिकामे होत गेले याचा आलेख म्हणजे टैंक चार्ट, विशिष्ट दिवशी पाण्याची पातळी मोजल्यावर, त्या विशिष्ट पातळीला धरणात किती दशलक्ष घनमीटर (किंवा दशलक्ष घन फूट) पाणी आहे हे टैंक चार्टवर वाचता येते. या टैंक चार्टमध्ये कालांतराने धरणात येणान्या गाळामुळे/ मातीमुळे फरक पडू शकतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वेक्षण करून सुधारित टैंक चार्ट बनवणे आवश्यक असते. हे नाही झाले तर 'क्ष' दशलक्ष घनमीटर पाणी

११