पान:सिंचननोंदी.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नियोजनाच्या अभावामुळे (खरे तर विकासाचा क्रम उलटा झाल्यामुळे) पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पात कशासमस्यायेऊ शकतात हा आहे.

प्रश्नाची व्याप्ती व गांभीर्य

 जाणकारांशी चर्चा: डोळे, कान व मन उघडे ठेऊन लामक्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात केलेली भटकंती; आणि काही प्रकल्पांचा मर्यादित अनुभव या आधारे असे म्हणता येईल की, 'पूर्ण झालेल्या बऱ्याच सिंचन प्रकल्पांमध्ये फक्त सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी कमी झालेली असण्याची शक्यता आहे. 'हाअर्थातच अंदाज आहे. तो किती चुकीचा किंवा किती बरोबर हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण राज्यातील पूर्ण झालेल्या मोठ्या, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पाची वरील संदर्मातील आकडेवारी अभ्यासायला हवी, असा अभ्यास झाला तरच प्रश्नाची व्याप्ती व गांभीर्यस्पष्ट होणार आहे. असाअभ्यास आपण करणार आहोत का?
 मुळात फक्त सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चाललेली: उपलब्ध पाण्यातून धरणातच होणारा झिरपा, बाष्पीभवनामुळे पाण्याचा अंदाजापेक्षाही जास्तव्यय, घरणातले पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी अन्यंत अकार्यक्षम कालव्यांचे जाळे व मागासलेली जुनाट पाणीवाटप पद्धत: प्रत्यक्ष शेतावर प्रवाही सिंचनात होणारा पाण्याचा अकार्यक्षम वापर: जेमतेम २५-३० टक्के एवढीच कार्यक्षमता असलेले आपले आजारी सिंचन प्रकल्प; अवास्तव अधिकृत पीकरचना आणि उसाचे अनधिकृत वास्तव या सर्व प्रकारांतूनखालील गंभीर परिणाम संभवतात. (किंबहुना ते प्रत्यक्षात दिसायलाही लागले आहेत)
 १)ओलीत क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल. घोषित संपूर्ण लाभक्षेत्राला पाणी मिळणार नाही किंवा फारच कमी प्रमाणात मिळेल.
 २) पाण्याची कमतरता, कमतरतेतून अनिश्चितता, अनिश्चिततेतून कटू स्पर्धा, स्पर्धेतून संघर्ष, संघर्षातून छोटे शेतकरी व मागासलेले विभाग यांच्या वाट्याला 'कोरडवाहूपण' अशी प्रक्रिया वेगाने सुरू होईल.
 ३) कायदे लाभक्षेत्राचे व नशीब मात्र कोरडवाहू शेतकन्यांचे अशा वास्तवामुळे तथाकथित लामधारकांमध्ये असंतोष वाढीलालागेल.
 ४) लाभक्षेत्रात तयार झालेल्या अशा कोरडवाहू क्षेत्रावर केलेली किंवा सध्या चालू असलेली विविध स्वरूपाची कामे (उदा. भूविकास भाग१ व२)पाण्याअभावी आणि म्हणून लोकसहभागाअभावी वाया जातील.
 वर वर्णन केलेली परिस्थिती व परिणामांबद्दलची भाकिते म्हणजे अतिशयोक्ती नाही. बागुलबुवा तर नाहीच नाही. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पात हे आज होऊ घातलं आहे याची सुस्पष्ट चिन्हे अनेक ठिकाणी आजच दिसताहेत. सर्व प्रकल्पातील 'टेल एंड'चा भाग आपल्याला काय सांगतो?
 उदाहरणच द्यायचे झाले तर प्रवरा डावा तट कालव्याच्या लाभक्षेत्रातील अशोक बंधान्यांचे उदाहरण देता येईल. टेल एंडला पुरेसे पाणी मिळत नाही याबद्दल तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया म्हणून शेतकरी लाभक्षेत्रात 'पाणी अडवा पाणी जिरवाः मोहीम राबवत आहेत. लाभक्षेत्रातील नैसर्गिक व निचन्यासाठी मुद्दाम खोदलेल्या चरांवर सुमारे ३०० बंधारे बांधून पाणी ठिकठिकाणी अडवण्याची योजना पाटबंधारे खात्याला व्यवस्थितपणे बाजूला सारून अत्यंत उत्साहात राबवली जात आहे. पाण्याच्या निच-याला लाभक्षेत्रात अडसर निर्माण करणे सिंचन कायदा १९७६ प्रमाणे गुन्हा आहे. सिंचन तंत्रज्ञानाप्रमाणेही हे गैर आहे. उत्साहपूर्ण लोकसहभागातून उत्स्फूर्तरीत्या होत असलेल्या या कायदेभंगातून आपण काय शिकणार आहोत? काय करणार आहोत आपण?दुर्लक्ष?