पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवली. पुढे हा कित्ता अमेरिका व आफ्रिकेतीला निग्रोंच्या मुक्ति संघर्षात आदर्श म्हणून अमलात आणला गेला. महात्मा गांधींमध्ये नैतिक व आध्यात्मिक शक्ती टोकाची होती. शरीरी सुखावर नियंत्रणाचे स्वेच्छा प्रयोग करणारा हा महात्मा! पुढे त्यांनी मनोबलाची प्रचिती अनेकदा दिली. विशेषतः कठोर निर्णय अमलात आणताना आंदोलन, उपोषण, तुरुंगातील त्यांचा आत्मनिग्रह याचीच साक्ष होय. सर्वधर्म समभाव केवळ त्यांच्या भजनात नव्हता. तो आचारधर्म त्यांनी कृतीत उतरवला. १९२८ साली ते म्हणाले होते की, 'मी या निर्णयाप्रत आलो आहे. (१) सर्व धर्म सत्य आहेत. (२) सर्व धर्मांत काही ना काही वैगुण्य आहे. (३) मला माझा हिंदू धर्म प्रिय आहे, तसेच अन्य सर्व धर्मही. महात्मा गांधी राजकीय क्षितिजावर अवतरले तेव्हा चळवळीची स्थिती व देशस्थिती फारशी अनुकूल नव्हती. ती त्यांनी अहिंसा, सत्याग्रह, समाजसुधारणा, ऐक्याचे विविध प्रयत्न यातून अनुकूल केली. इंग्रजांनी जनतेवरील धाक व वचक त्यांनी आपल्या निग्रही आचरणातून निष्क्रिय करून टाकला. त्यामुळे एके काळच्या इंग्रज मांडलिकांनी ‘सर', 'रावबहाद्दर', ‘खान बहादूर', ‘रावसाहेब' या पदव्या परत करणे एतद्देशीयांना भाग पाडले, इतक्या टोकाची राष्ट्रीय भावना सर्वात निर्माण करणे हेच महात्मा गांधींचे खरे योगदान होय. नेत्यांनी भाषणापेक्षा कृती करावी म्हणून किती लोकांना त्यांनी खेड्यात पाठवले त्याला गणती नाही. म्हणून ते आपल्या कल्पनेतला भारत निर्माण करू शकले. ती कल्पना स्पष्ट करताना एकदा ते म्हणाले होते की, “मी एका अशा भारतासाठी कार्य करीन, जिथे गरिबातील गरिबास असे वाटेल की, हा माझा देश आहे. त्याच्या निर्मितीत माझाही वाटा आहे. तो असा भारत असेल की ज्यात कोणी उच्च-नीच असणार नाही. अस्पृश्यतेचा अभिशाप तिथे नसेल नि नशेचे वरदानही तिथे असणार नाही. तिथं स्त्रीपुरुषांना समान अधिकार असतील. माझ्या स्वप्नातील भारत हा असा असेल."


३०. भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य : नेहरू


 मुक्तिबोधांनी ‘भारत: इतिहास और संस्कृती' ग्रंथ १९६२ साली लिहिला. तोवर पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कार्यकालाची १५ वर्षे पूर्ण केली होती. नेहरूंनी देशांतर्गत व परदेशातही

साहित्य आणि संस्कृती/९७