पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंदोलनाच्या सबुरी विरुद्ध आक्रमण धोरण संघर्षातून ‘जहाल' आणि 'मवाळ पक्ष उदयाला आले होते. परिणामी, भारतभर राष्ट्रीय भावनेचा फैलाव होण्यास मदतच झाली.


२८. राष्ट्रीय भावनेचा विकास : दुसरे पर्व


 लोकमान्य टिळकांचा मृत्यू सन १९२० ला झाला आणि राष्ट्रीय चळवळीचे दुसरे पर्व महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. पहिल्या पर्वात वैचारिक जागृतीचे कार्य झाले. तर दुस-या पर्वात सविनय आज्ञा भंग, चले जाव, मिठाचा सत्याग्रह, उपोषणे, निवेदने, मेळावे, अधिवेशने यातून पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात राष्ट्रीय आंदोलन संघटित व सक्रियपणे रेटण्यात महात्मा गांधींना यश आले. पण त्यामागे सन १९२० च्या दरम्यानचे जालियानवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ, असहयोग आंदोलन, गोलमेज परिषद कारणीभूत होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर दसच्या महायुद्धानंतरची बदलती राजकीय समीकरणे ही भारताच्या स्वातंत्र्य निर्णयास कारणीभूत होती, हे नोंद करायला मुक्तिबोध विसरत नाहीत. इतिहासकाराला नि संस्कृती अभ्यासकाला आंतर्राष्ट्रीय संदर्भाचं भाव असेल तर तो आपली चिकित्सा टोकदार करू शकतो, याचा प्रत्यय ‘भारत : इतिहास और संस्कृति' ग्रंथातील भारतीय स्वतंत्रता संग्राम विषयक मजकूर वाचताना सतत नि पानोपानी येत राहतो. हे पुस्तक मुळात येथेच संपते. स्वातंत्र्यप्राप्ती (१९४७) व प्रजासत्ताक निर्मिती (१९५०) पर्यंतचे ऐतिहासिक व सांस्कृतिक विश्लेषण, वर्णन मुक्तिबोधांना अपेक्षित होते. ती अभ्यासक्रमाची मर्यादाही होती. पुढील दोन-तीन परिच्छेदातून मुक्तिबोधांनी स्वातंत्र्य आंदोलनात भागीदारी व नेतृत्व करणा-या अनेक महनीय व्यक्तिरेखांचे योगदान व व्यक्तिमत्त्व वर्णिले आहे.


२९) राष्ट्रपिता महात्मा गांधी


 महात्मा गांधींसारखी व्यक्ती हजारो वर्षांनंतर एकदा जन्मते. अहिंसा आणि ‘सत्याग्रह' या दोन तत्त्वांच्या आधारे त्यांनी यावत चंद्र दिवाकरौ।' ची इंग्रजांची साम्राज्य लिप्सा मोडीत काढली. महात्मा गांधींनी आपल्या विचार आणि आचारांनी अहिंसात्मक संघर्षानेही विजय मिळू शकतो. त्या वेळी

साहित्य आणि संस्कृती/९६