पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्य-कारण संबंधांची संकल्पना ही अनुभवापलीकडची असते. त्या संकल्पनेमध्ये अनुभवापेक्षा कितीतरी अधिकच्या गोष्टी असतात. विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या महत्त्वपूर्ण संकल्पना (Concepts) अनुभूत वस्तूंतील सामान्य गुणांच्या परिवर्तनाने प्राप्त होत नसतात. त्यांची निर्मिती अनुभव, रचना (Structure) निर्माण करण्याच्या प्रक्रिया नि प्रयत्नांतून होत असते.

 ‘फीडो' शीर्षक ग्रंथात प्लेटोद्वारा प्रतिपादन एका नव्याच सिद्धातांची चर्चा सॉक्रेटिसने केले आहे. तो सिद्धांत म्हणजे, आपले सर्व ज्ञान म्हणजे स्मृती होय. सॉक्रेटिसने पुढे हे स्पष्ट केले आहे की केवळ अनुभवाद्वारे आपण पूर्ण समानता (Perfect Equality) समजून घेऊ शकत नाही. कारण दोन समान अनुभवांचे १00% आकलन केवळ अशक्य. आपण कितीही खबरदारी घेऊन दोन रेषा ओढल्या तरी त्या एक असणे अशक्य. त्यामुळे सॉक्रेटिस म्हणतो की, पूर्णतः समानतेची संकल्पना अथवा प्रचिती कदाचित मागील जन्मात झाली असेल, तिचे स्मरण आपणास आता होते. अशा विचित्र सिद्धांताचा स्वीकार कोण करणार ज्या मुळातच अपूर्ण समान आहेत बौद्धिक शक्तीच्या आधारावरच तर आपण वर्तमान सामाजिक, राजकीय व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठतर व्यवस्थेची कल्पना करत असतो.
 वैज्ञानिक नव, नवे शोध लावण्यासाठी जे प्रयोग, परीक्षणे करीत असतात, त्यातून मानवीय बुद्धिच्या सर्जनशील शक्तीचे संकेत मिळत असतात. गुंतागुंतीच्या विचार पद्धतींच्या निर्मितीसाठी सर्जनशीलतेची जरुरी असते, हे वेगळे सांगण्यासाठी गरज नाही. रिग्नानो यांनी उच्च दर्जाच्या सर्जनशीलतेचे एक चांगले उदाहरण देऊन ठेवले आहे. वैज्ञानिकांना माहिती असते की लोखंडी सळी तापली की त्याची लांबी वाढते. ते हेही जाणतात की लंबकाच्या गोळ्याचे वजन वाढले की त्याची आंदोलने गतिमान होतात. परंतु आजवर हे माहीत नव्हते की गोळ्याच्या वजनावर तापमानाचा परिणाम झाला तर त्याचा परिणाम लोलकावर (Pendulum) होतो. प्रयोगाने असे सिद्ध झाले आहे की खोलीतील तापमान वाढले की गती कमी होते, उलटपक्षी तापमान कमी झाले की गती वाढते.२४

 एखाद्या विचार पद्धतीच्या निर्मितीसाठी ज्या सर्जनशील नैपुण्याची गरज असते, त्याचे संकेत सुलभ असतात. या संदर्भात स्पिनोझा, हिगेल, सांख्य, वेदान्तादि पद्धतीच्या व्याख्यात्मक विश्लेषणाचे उदाहरण देता येण्यासारखे आहे. अशा सर्जनशील मानसिक प्रक्रियांत जी ज्ञानक्रिया घडत असते, त्यात असलेल्या निगम आणि विश्लेषणाचे नावीन्य, तसेच संयोजक ज्ञानातील आवश्यक शक्यता तर्कमूलक भाववादी नाकारत असतात.

साहित्य आणि संस्कृती/४९