पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शक्तीची घोषणा करते की जिच्या द्वारा आपण एका सचेत वा संवेदी भावनेच्या आधारे एका क्रियेच्या असंख्य पुनरावृत्ती करू शकतो. फक्त ती क्रिया मात्र एकदा सिद्ध होणे मात्र अनिवार्य असते. आपल्या बुद्धीस क्षमतेची जाणीव असते; प्रयोग म्हणजे त्या क्षमता सिद्धतेची संधी होय. त्यातून आपल्या हाती निष्कर्ष येत असतात."२३

 प्वांकरेद्वारा व्याख्यायित गणिताची आगम पद्धत त्या क्रियेचे व्यवच्छेदक उदाहरण होय, जिचा उल्लेख यापूर्वी ‘परिचित ज्ञानाचा विस्तार' म्हणून करण्यात आला आहे. एकाच कृतीच्या आवृत्तीची ही एक पद्धत आहे. तिच्याच आधारे परिचित अनुभवाचा विस्तार होत असतो. परिचित ज्ञानाच्या पुनरावृत्तीमूलक विस्तारामुळेच आपणास ‘एक कोटी' सारख्या प्रचंड संख्येचे ज्ञान झाले. हे ज्ञान मात्र विश्लेषण अथवा समानार्थक परिवर्तनाद्वारे (Toutologous Transformation) प्राप्त होत नाही.

 निष्कर्ष रूपात असे म्हणता येईल की, गणिताचे सामान्य सिद्धांत हे “परिचित अनुभवाच्या सृजन विस्ताराचे फलित होय. इतिहासाचे ज्ञानदेखील याच श्रेणीचे असते. इतिहासात आपण परिचित प्रेरणा (Motives) तसेच कार्यप्रणाली विस्ताराच्या माध्यमातून विस्तार व पुनर्रचना करत ज्ञानप्राप्ती करीत असतो. इथे थोड्या स्पष्टीकरणाची गरज आहे. नेपोलियन अथवा गटेचे जीवन आपल्या जीवनापेक्षा सर्वथा भिन्न. पण आपण त्याचे ज्ञान न आगम, न निगम पद्धतीने प्राप्त करतो. आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट वा संवादही नाही करू शकत. तरी ते प्रत्यक्ष प्राप्त करण्याची पद्धत म्हणजे परिचित अथवा ज्ञान स्रोताद्वारे शक्यतांचा सर्जनात्मक विस्तार आणि त्याची पुनर्रचना.

 आपली सर्जनात्मक शक्ती बोधशक्तीच्या रूपात प्रसृत होते, तेव्हा आपण हे समजले पाहिजे की त्या सर्व ठिकाणी जिथे निगम-विधी एक अशा नव्या ज्ञानाची जाणीव देते व आगमात्मक चिंतन वा विचार ‘काही कडून ‘सर्व' कडे अग्रेसर होत असतो. आपली बोधक्षमता सर्जनात्मक रुपात व्याप्त असते. वास्तविकतः सर्व प्रकारच्या संगठित ज्ञानात सृजनतत्त्व सामावलेले असते. एखादा वैज्ञानिकांचा सिद्धांत वा शोध, कवी तसेच क्रांतिकाच्यांचे अनुभव आणि आदर्श नेहमी प्रत्यक्ष अनुभवांपलीकडचे असतात.

 माणसाची सर्जनशीलता विज्ञान व तत्त्वज्ञान निर्मिती अनुभूती व संकल्पनांमध्ये आणि कल्पनामूलक तत्त्वांमध्ये असलेल्या घटकांत अनुस्यूत असते, ती प्रसंगोपात व्यक्त होते. उदाहरणार्थ, ह्यूमने सांगितल्याप्रमाणे

साहित्य आणि संस्कृती/४८