एकदम बुद्धिविरोधी असते. मनुष्य आपल्या जीवनध्येय व उद्दिष्टांच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या उपयोजनांसंदर्भात जीवनतत्त्वांची निवड करताना बुद्ध्याच निर्णय घेत नसतो. म्हणून मानवी प्रयत्नांचे उद्दिष्ट कायसारख्या प्रश्नावर खल करत राहणे निरर्थक ठरवते.
माणूस दुस-या अंगानेही याच निष्कर्षावर येताना दिसतो. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या विद्याशाखा तुलनेने नव्याच म्हणायला हव्यात. एकोणिसाव्या शतकात या विज्ञानावर विकासवादाचे वर्चस्व होते. ही विज्ञाने असे मानत आली आहेत की माणूस नित्य उच्चतर अशा स्थितीकडे अग्रेसर होत असतो. सोरोकिनचे असेच मत होते. '... अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात सामाजिक तत्त्वज्ञान असे मानत असे की विकास एकरेषीय प्रगतीकडे अग्रेसर असतो.३ विसाव्या शतकात या विज्ञानांनी स्वत:स विकासवादी विचारधारेपासून मुक्त करून घेतले आहे. त्यांचा या गोष्टींवर विश्वास राहिलेला नाही की मनुष्य निरंतर प्रगतीपर वाटचाल करतो. आता ही विज्ञाने (समाजशास्त्र, मानववंशशास्त्र) प्रगत, विकसित झाली आहेत. आता ती विज्ञाने सर्वाधिक भर देतात ती मूल्यांसंबंधीच्या एकांत सापेक्षतेवर .
नैतिक सापेक्षतावादासंदर्भात (Ethical Relativity) वेस्टरमार्क यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सन १९३२ मध्ये प्रकाशित त्यांच्या ग्रंथाचे हेच नाव आहे 'नैतिक सापेक्षतावाद'. त्यापूर्वी त्यांचे ‘नैतिक धारणा : उगम आणि विकास' हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या ग्रंथात वेस्टर मार्क या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचले होते की, “नैतिक वक्तव्यांचा उगम हा आवेगातून होतो. या निष्कर्षाचा स्पष्ट अर्थ होता की आपली नैतिक वक्तव्ये वस्तुनिष्ठरित्या प्रामाणिक असत नाहीत. मात्र आपली सर्वसाधारण (सहज) बुद्धी आणि नीतिशास्त्राचे आदर्श-मूलक सिद्धांत प्रामाणिक असतात."४ नैतिक सापेक्षतेचा अर्थ असा आहे की नैतिक जीवनाची कोणतीही वस्तुनिष्ठ कसोटी अशी नसते.'५ ती सर्वमान्य वा स्वीकार्य नसते. नैतिकतेच्या वस्तुनिष्ठतेसंबंधी मानववंशशास्त्री अलीकडे असाच विचार व्यक्त करू लागले आहेत.
वर ज्या कारण, तत्त्वांची चर्चा केली ते सर्व आजच्या सांस्कृतिक संकटांचे मूळ आहे. ते जीवनाच्या मूल्य नि आदर्शासंबंधीची अनिश्चितता नि भ्रम निर्माण करत असतात. आजच्या काळचे संकट हे एकोणिसाव्या शतकाच्या संकटांपेक्षा खरे तर गंभीर व गहिरे आहे. त्यामुळे त्याचा प्रभावही