पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपयोगितावादी दृष्टिकोन धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारी गोष्ट होय. यातूनच जातीय दंगे होतात असा अनुभव आहे. भारत केवळ हिंदूचे राष्ट्र नाही. अठरापगड जाती इथे रहातात. मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन, शीख धर्मीय इथे आहेत. धर्मनिरपेक्षता केवळ तत्त्व नव्हे, तर तो व्यवहार आहे, हे समजून घ्यायला हवे. विष्णु प्रभाकरांनी या निबंधात स्पष्ट मत नोंदवत म्हटलं आहे की “सामाजिक प्रश्नों को धर्म से जोड़ कर ओर धर्मनिरपेक्षता की दुहाई देकर, सांप्रदायिक तत्त्वों को बल देना प्रजातंत्र की जड़ों पर (मुळावर) कुठाराघात करना है। इसलिए सत्ता जब तक अपना स्वरूप नहीं बदलती, संविधान में धर्मनिरपेक्षता की बात लिख देना कोई अर्थ नहीं रखता।" विष्णु प्रभाकरांनी धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात किती महत्वाचे आहे, हे संस्कृतीच्या अंगानी त्या लेखात अधोरेखित केलं आहे. या पुस्तकातील ‘भावात्मक एकता’ ‘समन्वय और सह-अस्तित्व' सारखे लेखही संस्कृती संदर्भाने महत्त्वाचे होत.

संस्कृति क्या है?

 विष्णू प्रभाकर यांनी सदर पुस्तकात संस्कृतीचा संबंध 'संस्कार' आणि ‘सृजन प्रतिभा' या दोन घटकांच्या अंगाने विशद केला आहे. संस्कृती माणसास प्रगल्भ करते. त्यातून माणसात शांती, सहनशीलता, विनम्रता, आत्मज्ञान, क्रोध, अहंकार, प्रलोभनादी गुण-दोषांची जाण निर्माण होते. सत्य, शिव, सुंदरतेचा विकास होऊन तो सर्जक बनतो. 'मी'च्या पलीकडे ‘पर'चा विचार उगम पावणे त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची ओळख तयार होते. संस्कृती म्हणजे विकास ही गोष्ट लेखक या ग्रंथातील अनेक निबंधांतून स्पष्ट करतो. यातील अनेक निबंध पूर्व पुस्तकात असले तरी यातील दसरा खंड सर्वथा नवा आहे. परंतु तो व्यक्ती संस्कार परीघात घुटमळत राहतो.

 ‘संस्कृति के रूप अनेक' शीर्षक लेख आपणास म्यानमार (ब्रह्मदेश), कंबोडिया, थायलंडची संस्कृती समजावतो. प्रवासावर आधारित लेखकाचं हे निरीक्षण, टिपण, पण ते मानवी संस्कृतीच्या नव्या ऐतिहासिक व भौगोलिक छटांचे दर्शन घडविते. हे आपले शेजारी देश. त्यांची वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती नाही, पण समृद्ध संस्कृती त्यांच्याजवळ आहे. तेच त्यांचं बलस्थान वाटतं. यात त्यांनी अनेक साहित्यकृतींचे संदर्भ देत संस्कृतीचा आधार साहित्य असल्याचं अधोरेखित केले आहे. हिंदू संस्कृतीच्या विविध छटा दाखवणारा लेख त्या देशांबद्दल जिज्ञासा निर्माण करतो. उदाहरणार्थ ‘औं आंः सुची और बर्मा की जनक्रांति', ‘उत्पातीशनिपुत्र' (आत्मकथा) ब्रह्मदेशाबद्दलची

साहित्य आणि संस्कृती/१७२