पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भरपूर हो सकें। हमारा योग आणि क्षेम संपन्न हो।'

 लेखाचा दुसरा खंड समाज जीवन स्पष्ट करतो. त्यानुसार त्या काळी देवपूजेशिवाय नित्य मातृपूजा होत असे. यज्ञ हे मुख्य धर्मकार्य मानलं जायचं. समाजास माणसांपेक्षा देवाचं पडलेलं असायचं. देवाची करुणा भाकण्यात माणसाचं आयुष्य जायचं. श्राद्ध-तर्पण केलं जायचं. विवाह प्रथा होती. पुरुष बहुपत्नीधारी असायचा. परंतु एकपत्नीत्वाचं श्रेष्ठत्त्व समाजमान्य होतं. त्यास प्रतिष्ठा होती. विवाह प्रकार अनेक होते. - स्वयंवर, हरण, कन्यादान आणि क्रय. (म्हणजे हंडा देऊन विकत घेणे). विवाह बंधने शिथिल होती. आर्य-अनार्यात रोटी-बेटी व्यवहार होते. जाती नव्हत्या. सुरापान चाले. दूध-दुभते विपुल होते. ते समृद्धीचे प्रतीक मानले जायचे. विशेष म्हणजे त्या काळी कापूस नव्हता. रेशीम व लोकर (जैविक धागे)होती. त्यांचीच वस्त्रे असत. मनोरंजनार्थ घोडे, रथ स्पर्धा, पशु-पक्षी टकरी, जुगार, नृत्य, संगीत प्रचलित होते. गावे खेडीच होती. घरे दगडी, लाकडी असायची. आर्यांचे स्वतःचे असे विकसित रोग विज्ञान (निदान) होतं. उपचार पद्धती, औषधी होती. हे सारं वर्तमान मनुष्य विकासाचा आलेख समजून घ्यायला म्हणून एक उपयुक्त आकलन लेख वाटतो. या पुस्तकातील ‘दक्षिण पूर्व एशिया में भारतीय संस्कृति' लेखातूनही नवे संदर्भ हाती लागतात. संस्कृती संदर्भाचा पट विस्तारण्याचं कार्य विष्णू प्रभाकरांचं हे पुस्तक करतं.

 ‘धर्मनिरपेक्षता मेरी नजर में शीर्षक लेख या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा लेख होय. या लेखाचे स्वरूप मराठी लघुनिबंधासारखं आहे. लेखक विष्णू प्रभाकर यांनी अनेक उदाहरणे, छोट्या कथा, किस्से, प्रसंग सांगत धर्मनिरपेक्षतेचं नेमकेपण आपल्या लक्षात आणून दिलं आहे. लेखकाची अशी धारणा आहे की या विषयाचे खरे आकलन व्हायचं तर आपण शब्दार्थ, व्याख्या, घटनेतील कलमे यांच्या परीघाबाहेर जाऊन एक उदारमतवादी दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे. पोपटपंचीने हा विषय कळणार नाही. त्याचे मूळ तत्त्व समजून घेणे महत्त्वाचे. भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे की हे राज्य (राष्ट्र) कोणा नागरिकांत धर्म, जात, वर्ण, लिंग, जन्मस्थान अशा आधारे भेदभाव करणार नाही. सर्वांना आपले धर्माचरण करण्याचे स्वातंत्र्य अबाधित असेल. एका अर्थाने ही सर्व धर्म जात, वर्ण, लिंग समानतेची हमीच होय. या पार्श्वभूमीवर काही विचारधारा, संघटना विशिष्ट धर्म, जाती, वर्णाचा आग्रह धरताना दिसतात. या आग्रहातून अन्यांप्रती वैरभाव निर्माण होतो. तिथेच धर्मनिरपेक्षता संपते. धर्माचा

साहित्य आणि संस्कृती/१७१